Google Maps वर ‘अशा’प्रकारे बघा रस्त्यांचे 360° व्ह्यू, जाणून घ्या Android युजर्ससाठी स्टेप्स

Google Maps वर ‘अशा’प्रकारे बघा रस्त्यांचे 360° व्ह्यू, जाणून घ्या Android युजर्ससाठी स्टेप्स
HIGHLIGHTS

भारतातील Google मॅप्स ऍपवर स्ट्रीट व्ह्यू फिचर लाँच

Google Maps वर नवीन फिचरद्वारे रस्त्यांचे 360° व्ह्यू बघा

ही सुविधा सध्या 10 शहरांमध्ये उपलब्ध

Google ने घोषणा केली की, ते भारतातील Google मॅप्स ऍपवर स्ट्रीट व्ह्यू पुन्हा सादर करत आहे. सुरुवातीला, ही सुविधा 10 शहरांमध्ये उपलब्ध असेल, ज्यात बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसर यांचा समावेश आहे. या फीचरच्या माध्यमातून गुगल मॅप्सवर वापरकर्त्यांना रस्त्यांचा 360 डिग्री व्ह्यू पाहता येणार आहे. कंपनीने यासाठी टेक महिंद्रा आणि जेनेसिस इंटरनॅशनलसोबत भागीदारी केली आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि ios दोन्हीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने असेही म्हटले आहे की, ते 2022 च्या अखेरीस भारतातील आणखी 50 शहरांमध्ये ही सुविधा विस्तारित करेल.

हे सुद्धा वाचा : Driving License मधील पत्ता बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग, ना RTO मध्ये जाण्याची गरज, ना एजंटचा खर्च

याव्यतिरिक्त, कंपनीने सांगितले की ते स्थानिक डेव्हलपर्सना स्ट्रीट व्ह्यू API प्रदान करेल. लवकरच भारतातील गुगल मॅपवर स्ट्रीट व्ह्यू फीचर येणार आहे.  या लेखात एक सविस्तर गाईडलाईन दिली आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की तुम्ही हे फिचर कसे युज करू शकता… 

Android वर Google मॅप्स मध्ये स्ट्रीट व्ह्यू कसे वापरावे ? 

स्टेप 1 : तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google मॅप्स ऍप उघडा.

स्टेप 2 : ठिकाण शोधा किंवा मॅपवर एक पिन प्रविष्ट करा.

स्टेप 3 : पिन प्रविष्ट करण्यासाठी, मॅप्सवर एखाद्या स्थानावर टच करा आणि धरून ठेवा. 

स्टेप 4 : खाली, ठिकाणाचे नाव किंवा पत्ता टॅप करा.

स्टेप 5 : स्क्रोल करा आणि 'स्ट्रीट व्ह्यू' लेबल असलेली फोटो निवडा किंवा स्ट्रीट व्ह्यू आयकॉन 360 फोटो असलेला थंबनेल सिलेक्ट करा. 

स्टेप 6 : पूर्ण झाल्यावर, वरच्या डावीकडे, मागे टॅप करा.

Android वर Google मॅपमध्ये स्ट्रीट व्ह्यू लेयर कसे वापरावे ? 

स्टेप 1 : तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google मॅप्स ऍप उघडा.

स्टेप 2 :  सर्वात वर लेयर्स आणि स्ट्रीट व्ह्यू वर टॅप करा. 

स्टेप 3 : नकाशांवरील निळ्या रेषा स्ट्रीट व्ह्यू कव्हरेज दर्शवतात. स्ट्रीट व्ह्यूमध्ये प्रविष्ट करण्यासाठी कोणत्याही निळ्या रेषेवर टॅप करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo