WhatsApp अँड्रॉइड वापरकर्ते ऍपमधील मीडिया कंटेंट गहाळ झाल्यामुळे चिंतेत आहेत. नुकत्याच झालेल्या व्हॉट्सऍप अपडेटनंतर ही समस्या पाहायला मिळत आहे. WhatsApp च्या Android वर्जन 2.21.9.2 आणि 2.21.9.3. परंतु विद्यमान वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही वापरकर्त्यांना त्यांच्या लेटेस्ट वर्जनवर देखील ही समस्या दिसत आहे. मात्र, इन्स्टंट मेसेजिंग ऍपने अद्याप या समस्येवर कोणतेही विधान दिलेले नाही किंवा त्याच्या निराकरणाबद्दल काहीही सांगितले नाही.
हे सुद्धा वाचा : Google Maps ऍप तुमचे पैसे वाचवेल, सांगणार कोणत्या मार्गाने कमीत कमी लागेल पेट्रोल-डिझेल
WhatsApp बीटा ट्रॅकर WABetaInfo ने अहवाल दिला आहे की, काही वापरकर्त्यांच्या लक्षात आले आहे की ते त्यांच्या नवीनतम WhatsApp Android वर्जनवर फोटो आणि व्हिडिओंसारखी मीडिया कंटेंट शोधण्यात अक्षम आहेत. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना WhatsApp वर या समस्येचा सामना करावा लागतो, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून ऍपमध्ये मीडिया कंटेंट शोधू शकता.
WABetaInfo ने Android साठी WhatsApp वर मीडिया प्रॉब्लम कशी शोधायची आणि त्याचे निराकरण कसे करावे हे सांगितले आहे. मात्र, वापरकर्त्यांना प्रक्रिया स्पष्ट करण्यापूर्वी त्यांच्या चॅटचा बॅकअप घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
> सर्व प्रथम तुमच्या फोनवर WhatsApp निवडा आणि कॅशे क्लियर करा. ऍप बॅकग्राउंडमध्ये चालत नसल्याची खात्री करा.
> आता तुमच्या फोनचा फाईल मॅनेजर उघडा, व्हॉट्सऍपवर जा आणि मीडियावर जा.
– आता मीडिया फोल्डर कन्टेन्ट Android> Media> com.whatsapp> WhatsApp>> Media वर हलवा. लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त मीडिया फोल्डर कंटेंट मुव्ह करायचा आहे, संपूर्ण फोल्डर नाही.
> यानंतर तुम्हाला सर्व कंटेंट योग्य ठिकाणी जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, व्हॉट्सऍप उघडा.
तुम्हाला दिसेल की तुमचा सर्व मीडिया कंटेंट WhatsApp वर परत आला आहे.