WhatsApp iOS आणि Android दोन्ही पर्यायांमध्ये नको असलेले कॉन्टॅक्ट ब्लॉक करण्याचा पर्याय देतो. कधीतरी कुणी तुम्हालासुद्धा ब्लॉक करतात. मात्र, WhatsApp कडे असा कोणताही फीचर नाही, जो तुम्ही ब्लॉक झाल्यास तुम्हाला अलर्ट करेल. पण तुम्हाला कुणी ब्लॉक केले आहे का ? हे शोधून काढायचे असेल तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. तुम्हाला व्हॉट्सऍपवर कोणी ब्लॉक केले हे शोधण्याचे कोणतेही निश्चित मार्ग नाही, तरीसुद्धा खालील टिप्सद्वारे तुम्हाला याबाबत कल्पना नक्कीच येईल.
हे सुद्धा वाचा : 10.36 इंच डिस्प्लेसह Oppo Pad Air भारतात लाँच, 7 GB रॅमसह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स
एखाद्याचे ऑनलाइन स्टेटस किंवा लास्ट सीन आधी दिसत होते, मात्र आता दिसत नाहीये. तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असल्याची शक्यता आहे.
जर एखाद्या कॉन्टॅक्टचा प्रोफाईल फोटो अचानक तुम्हाला दिसत नसेल. तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला शंका असेल की, कोणीतरी तुम्हाला WhatsApp वर ब्लॉक केले. तर त्यांना मेसेज पाठवा. मॅसेज न गेल्यास कॉन्टॅक्टने तुम्हाला ब्लॉक केले आहे किंवा त्यांचा इंटरनेट देखील बंद असू शकतो. परंतु, एक किंवा दोन दिवसांनंतरही मॅसेज न गेल्यास, पुढील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
जर तुम्हाला शंका असेल की, कोणीतरी तुम्हाला WhatsApp वर ब्लॉक केले. त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ब्लॉक असल्यास तुमचा कॉल त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. जर व्हॉट्सऍप कॉलमध्ये 'रिंगिंग' स्टेटस दिसत नसेल, तर तुम्ही ब्लॉक असू शकता.
तुम्ही व्हॉट्सऍप वर ब्लॉक आहात का? हे जाणून घेण्यासाठी तर एक ग्रुप तयार करा. जर तुम्हाला "तुम्ही हा संपर्क जोडण्यासाठी अधिकृत नाही" असा मेसेज आला. तर तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केले असू शकते.