आता थेट WhatsApp वर Aadhaar आणि PAN card डाउनलोड करा, बघा स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया
आता WhatsApp वरून तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करा.
WhatsApp चॅटबॉटद्वारे Digilocker वरून आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे डाउनलोड करता येतील.
तुम्ही फक्त डिजिलॉकरद्वारे जारी केलेले दस्तऐवज डाउनलोड करू शकता.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय Meity ने काही वर्षांपूर्वी DigiLocker सेवा सुरू केली होती. डिजीलॉकर मूळ जारीकर्त्यांकडून डिजिटल स्वरूपात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि मार्कशीट यासारख्या प्रमाणीकृत कागदपत्रे/प्रमाणपत्रांमध्ये प्रवेश प्रदान करतो. त्याचप्रमाणे, आधार धारकांसाठी एक समर्पित DigiLocker वेबसाइट आणि ऍप आहे, त्याच्या सेवा WhatsApp वर देखील उपलब्ध आहेत.
म्हणजेच, लोक MyGov हेल्पडेस्क WhatsApp चॅटबॉटद्वारे Digilocker वरून आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे सहजपणे डाउनलोड करू शकतात.
हे सुद्धा वाचा : Oppo च्या सर्व 5G उपकरणांमध्ये चालेल Airtel 5G Plus, दोन्ही कंपन्यांनी केली भागीदारी
MyGov हेल्पडेस्क चॅटबॉट वापरून, तुम्हाला काही सोप्या स्टेप्समध्ये तुमचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज सहजपणे डाउनलोड करता येईल. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट आणि बरेच काही समाविष्ट आहे. त्यामुळे, जर तुम्हाला अजूनही वेबसाइट किंवा ऍपद्वारे डिजीलॉकर चालवण्यात अडचण येत असेल, तर WhatsApp चॅटबॉट सेवा तुमच्यासाठी हजर आहे.
प्रक्रिया बघण्याआधी लक्षात ठेवा, तुम्ही एका वेळी फक्त एकच दस्तऐवज डाउनलोड करू शकता. तसेच, तुम्ही फक्त डिजिलॉकरद्वारे जारी केलेले दस्तऐवज डाउनलोड करू शकता. जर तुमची आवश्यक कागदपत्रे जारी केली गेली नाहीत, तर तुम्हाला ती डिजीलॉकर साइट किंवा ऍपवर मिळतील.
WhatsApp वरील MyGov HelpDesk चॅटबॉट वरून तुमचे दस्तऐवज ऍक्सेस करण्यासाठी, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया बघा:
स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये MyGov हेल्पडेस्क संपर्क क्रमांक म्हणून +91-9013151515 सेव्ह करा.
स्टेप 2: आता WhatsApp उघडा आणि तुमची WhatsApp संपर्क सूची रीफ्रेश करा.
स्टेप 3: MyGov Helpdesk Chatbot शोधा आणि उघडा.
स्टेप 4: आता MyGov हेल्पडेस्क चॅटमध्ये 'नमस्ते' किंवा 'Hi' टाइप करा.
स्टेप 5: चॅटबॉट तुम्हाला डिजिलॉकर किंवा कोविन सेवा यापैकी एक निवडण्यास सांगेल. येथे 'DigiLocker Services' निवडा.
स्टेप 6: आता चॅटबॉट विचारेल की तुमचे डिजिलॉकर खाते आहे का, म्हणून येथे 'होय' वर टॅप करा. तुमच्याकडे नसेल तर अधिकृत वेबसाइट किंवा डिजिलॉकर ऍपला भेट देऊन तुमचे खाते तयार करा.
स्टेप 7: चॅटबॉट आता तुमचा 12-अंकी आधार क्रमांक तुमच्या DigiLocker खाते लिंक आणि ऑथेंटिकेट करण्यासाठी विचारेल. तुमचा आधार क्रमांक टाका आणि पाठवा.
स्टेप 8: तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. तो OTP चॅटबॉटवर प्रविष्ट करा.
स्टेप 9: चॅटबॉट सूची तुम्हाला तुमच्या DigiLocker खात्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची सूची दाखवेल.
स्टेप 10: तुमचे डॉक्युमेंट डाउनलोड करण्यासाठी लिस्टेड नंबर टाइप करा आणि पाठवा.
स्टेप 11: तुमचे डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये चॅट बॉक्समध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile