फीचर फोनद्वारे UPI पेमेंट कसे कराल? प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

फीचर फोनद्वारे UPI पेमेंट कसे कराल? प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
HIGHLIGHTS

सरकारने काही काळापूर्वी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट पर्यायही उपलब्ध करून दिला.

फीचर फोन वापरकर्ते UPI 123PAY च्या मदतीने डिजिटल व्यवहार करू शकतात.

आजकाल क्वचितच लोक आपल्या खिशात काही पैसे ठेवत असतील. कारण ऑनलाइन पेमेंट पद्धती आल्यामुळे कुणीही आपल्या जवळ जास्त रक्कम ठेवत नाही. अशात तुम्हाला पेमेंट करायचे असल्यास तुम्हाला फोनद्वारे ऑनलाइन पेमेंट करता येते. यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोनचं हवे, अशी काही अट नाही. सरकारने काही काळापूर्वी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. फीचर फोन वापरकर्ते UPI 123PAY च्या मदतीने डिजिटल व्यवहार करू शकतात. 

आम्ही तुम्हाला सांगतो, UPI 123PAY ही NPCI ची एक झटपट पेमेंट सिस्टम आहे, जी फीचर फोनसाठी सादर करण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण फीचर फोनद्वारे UPI पेमेंट सोप्या पद्धतीने कसे करता येईल.

फीचर फोनद्वारे UPI पेमेंट करण्याची प्रक्रिया :

– वापरकर्त्यांनी त्यांचे बँक खाते फीचर फोन नंबरशी लिंक करा.

– यानंतर तुमच्या बँक कार्डच्या तपशीलाद्वारे UPI पिन सेट करा.

– यानंतर तुम्ही तुमच्या फीचर फोनवरून IVR नंबर म्हणजेच 08045163666, 08045163581, किंवा 6366200200 वर कॉल करा.

– यानंतर तुमच्या समोर मेनू येईल. येथे तुम्ही दिलेल्या पर्यायातून 'मनी ट्रान्सफर' पर्याय निवडा.

– यानंतर तुमच्या समोर कॉन्टॅक्ट मेनू येईल. तुम्हाला UPI द्वारे ज्या नंबरवर पैसे पाठवायचे आहेत, तो नंबर निवडा.

– आता पेमेंट अकाऊंटचे तपशील प्रविष्ट करा.

– पेमेंट खाते प्रविष्ट केल्यानंतर, आता तुम्हाला UPI पिन प्रविष्ट करावा लागेल. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फीचर फोनद्वारे UPI पेमेंट ऑनलाइन करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo