WhatsApp मॅसेजवरून आता FASTagवर रिचार्ज करा, फक्त ‘या’ नंबरवर ‘Hi’ पाठवा

WhatsApp मॅसेजवरून आता FASTagवर रिचार्ज करा, फक्त ‘या’ नंबरवर ‘Hi’ पाठवा
HIGHLIGHTS

FASTag वर रिचार्ज करणे आता अधिक सोपे

Whatsapp द्वारे FASTag वर रिचार्ज करता येईल

Whatsapp वर फक्त 'या' क्रमांकावर Hi पाठवा

आता FASTag रिचार्ज करणे हे WhatsApp मेसेज पाठवण्याइतकेच सोपे आहे. जरी वाहन मालकांसाठी FASTag रिचार्ज करणे सामान्य झाले आहे. परंतु वापरकर्त्यांसाठी पेमेंट सुलभ करण्यासाठी बँक नवीन मार्ग आणत आहेत. WhatsApp वर FASTag रिचार्ज सुलभ करण्यासाठी IDFC FIRST बँकेने WhatsApp सोबत भागीदारी केली आहे. नवीन 'पेमेंट्स ऑन WhatsApp' फीचरमुळे बँकेच्या ग्राहकांसाठी FASTag रिचार्ज करणे सोपे होणार आहे. बँकेचे ग्राहक त्यांचा FASTag IDFC First च्या WhatsApp चॅटबॉटमध्ये रिचार्ज करू शकतात आणि संपूर्ण रिचार्ज प्रक्रिया चॅटमध्ये करता येईल. 

हे सुद्धा वाचा : iPhone 14 आणि Watch 8 ची आज पहिली सेल, जाणून घ्या डिस्काउंट आणि ऑफर्स

Whatsapp द्वारे फास्टॅग कसे रिचार्ज कराल ? 

> IDFC फर्स्ट बँकेचे ग्राहक बँकेच्या अधिकृत व्हॉट्सऍप चॅटबॉट क्रमांक +9195555555555 वर 'Hi' पाठवून याची सुरुवात करू शकतात. 

> व्हॉट्सऍप चॅटमध्ये रिचार्ज पर्याय निवडल्यावर, ग्राहकांना रक्कम प्रविष्ट करावी लागेल आणि OTP द्वारे व्यवहार प्रमाणित करावा लागेल. 

> त्यानंतर त्यांना ट्रांजेक्शन कंफर्मेशन प्राप्त होईल. 

नवीन सेवा वापरकर्त्यांना त्यांच्या रिचार्जसाठी इतर कोणत्याही मोबाइल ऍप किंवा नेटबँकिंग पोर्टलवर लॉग इन न करता 'पेमेंट्स ऑन WhatsApp'द्वारे पैसे देण्याची सुविधा असेल.

Whatsapp Pay म्हणजे काय ? 

WhatsApp वरील पेमेंट वापरकर्त्यांना त्यांच्या संपर्कांकडून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे पैसे पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास अनुमती देतो. वापरकर्त्यांना प्रत्येक पेमेंटसाठी वैयक्तिक UPI-PIN टाकावा लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo