अप्रतिम युक्ती ! WhatsApp स्टेटस पहा आणि कुणाला माहीतही होणार नाही, जाणून घ्या ही खास युक्ती

Updated on 18-Aug-2022
HIGHLIGHTS

WhatsApp तुमच्या प्रायव्हसीची संपूर्ण काळजी घेतो

संपर्काचे WhatsApp स्टेटस गुप्तपणे कसे पहाल

जाणून घ्या यासाठी अप्रतिम युक्ती

आपल्या सामाजिक जीवनाबद्दल मित्र आणि नातेवाईकांना सांगण्यासाठी WhatsApp स्टेटसचा वापर केला जातो. WhatsApp स्टेटसच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता लोकांना त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा X लवर्स यांचे स्टेटस गुपचूप बघायचे असतात. आजच्या काळात क्वचितच असा कोणी असेल जो व्हॉट्सऍप वापरत नाही. व्हॉट्सऍपमध्ये असे अनेक फिचर्स आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सऍप स्टेटसशी संबंधित एका गुप्त ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कोणाचेही स्टेटस गुप्तपणे पाहू शकता.

हे सुद्धा वाचा : Infinix Hot 12 स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 90Hz डिस्प्लेसह लाँच

एखाद्याचे WhatsApp स्टेटस गुप्तपणे कसे पहावे?

WhatsApp अँड्रॉइड आणि iOS वापरकर्ते त्यांच्या कॉन्टॅक्टचे स्टेटस त्यांना न कळवता रीड रिसिप्ट डिसेबल  करून आणि ऑफलाइन पाहू शकतात. आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही एखाद्याचे स्टेटस गुपचूप कसे पाहू शकता:

स्टेप 1 : सर्व प्रथम तुमचे WhatsApp उघडा.

स्टेप 2 : आता तुम्हाला व्हॉट्सऍपच्या होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील.

स्टेप 3 : या तीन डॉट्सवर टॅप करा आणि त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. या पर्यायांमधून, सेटिंग्जवर टॅप करा.

स्टेप 4 : यानंतर अकाउंट ऑप्शनवर टॅप करा.

स्टेप 5 : हे केल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 6 : येथे तुम्हाला Read receipt चा पर्याय दिसेल, येथे तुम्हाला हे फिचर डिसेबल करावे लागेल.

स्टेप 7 : तुम्ही Read receipt फीचर डिसेबल करताच, तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्सचे व्हॉट्सऍप स्टेटस पाहिले आहे की नाही, हे तुमच्या संपर्काच्या लक्षात येणार नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :