UPI टिप्स : तुमचा फोन हरवला तर UPI खाते निष्क्रिय कसे कराल ? जाणून घ्या सोपा मार्ग

UPI टिप्स : तुमचा फोन हरवला तर UPI खाते निष्क्रिय कसे कराल ? जाणून घ्या सोपा मार्ग

कोविड-19 नंतर डिजिटल पेमेंटचा (UPI) ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. आता जवळजवळ प्रत्येकजण डिजिटल पेमेंट वापरत आहे. महामारीच्या काळातही, डिजिटल पेमेंट पर्याय आणि टचलेस व्यवहारांमुळे व्यवहार करण्यास  मदत झाली. तेव्हापासून डिजिटल पेमेंटमध्ये तेजी आली आहे. सहसा आम्ही खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करतो, कारण मोबाइल वापरून UPI ​​पेमेंट करणे सोपे आहे. UPI पेमेंट पर्यायासह, तुमच्या खिशात कॅश ठेवण्याची गरज जवळपास संपुष्टात आली आहे. 

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Redmi Note 10 Pro वर 13,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, Flipkart वर अप्रतिम डील उपलब्ध

 तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही मोठ्या मॉल्सपासून ते छोट्या किराणा दुकानापर्यंत याद्वारे खरेदी करू शकता. अशा परिस्थितीत जर तुमचा मोबाईल कुठेतरी हरवला असेल तर ते तुमचे बँक अकाउंट रिकामे होण्याची शक्यता आहे. या लेखात, तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तुम्ही UPI खाते सहजपणे कसे निष्क्रिय कराल, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत… 

UPI निष्क्रिय करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा 

> फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, सर्वप्रथम तुमच्या मोबाइल नेटवर्कच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला कॉल करा आणि तुमचा मोबाइल नंबर आणि सिम त्वरित ब्लॉक करण्यास सांगा. यामुळे तुमचा मोबाइल नंबर वापरून UPI ​​पिन तयार करणे प्रतिबंधित होईल.

> सिम ब्लॉक करण्यासाठी, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, बिलिंग पत्ता, शेवटचे रिचार्ज तपशील, ईमेल आयडी इत्यादी तपशील विचारू शकतात.

> यानंतर, तुम्हाला तुमच्या बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुमचे बँक खाते ब्लॉक करण्यास आणि UPI सेवा बंद करण्यास सांगावे लागेल.

> यानंतर तुम्हाला फोन हरवल्याची FIR नोंदवावी लागेल, याचा वापर करून तुम्ही तुमचे सिम आणि बँकिंग सेवा नंतर पुन्हा सुरू करू शकता.

मोबाईल वापरून UPI ​​पेमेंट करणे सोपे आहे. त्यामुळे खिशात केस ठेवण्याची गरज जवळपास संपुष्टात आली आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo