How to: Paytm FASTag कसे डीऍक्टिव्हेट करावे? 29 फेब्रुवारीनंतर काम करणार नाही, बघा स्टेप बाय स्टेप प्रोसेस। Tech News

Updated on 19-Feb-2024
HIGHLIGHTS

RBI ने बुधवारी Paytm पेमेंट्स बँक (PPBL) बाबत मोठे पाऊल उचलले.

तुम्ही Paytm वरून FASTag देखील रिचार्ज करू शकणार नाही.

वापरकर्त्यांनी Paytm FASTag कसे डीऍक्टिव्हेट करावे? पुढे बघा-

RBI ने बुधवारी Paytm पेमेंट्स बँकेबाबत (PPBL) मोठे पाऊल उचलले. कंपनीला 29 फेब्रुवारीनंतर वॉलेट, FASTag आणि इतर उपकरणांसह कोणत्याही ग्राहक खात्यावर जमा किंवा टॉप-अप स्वीकारणे थांबवण्यास सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, सिस्टम ऑडिट रिपोर्ट आणि बाह्य ऑडिटर्सचे अनुपालन प्रमाणीकरण अहवाल प्राप्त झाल्यानंतर RBI ने हा निर्णय घेतला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही Paytm वरून FasTAG देखील रिचार्ज करू शकणार नाही. जर तुम्ही 31 जानेवारीपर्यंत तुमच्या KYC अपडेट केला नसेल, तर तुम्ही Paytm वर FasTAG वापरण्यास सक्षम असणार नाही. वापरकर्त्यांनी Paytm FASTag कसे डीऍक्टिव्हेट करावे? पुढे बघा-

FASTag म्हणजे काय?

FASTag च्या आवश्यकतेनुसार तुमच्या सर्व चारचाकी वाहनांच्या विंडशील्डवर FASTag असणे, अनिवार्य आहे. FASTag ही NHAI द्वारे चालवली जाणारी भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम आहे. हे प्रीपेड वॉलेटद्वारे टोल बूथवर पेमेंट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करते.

FASTags-app

Paytm FASTag कसे डीऍक्टिव्हेट करावे?

  • तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर Paytm ॲप डाउनलोड करा आणि तुमचे क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करा.
  • आता सर्च बारवर ‘FASTag’ टाइप करा आणि नंतर ‘Services’ विभागात जाऊन ‘Manage FASTag’ वर टॅप करा.
  • आता तुमच्यासमोर एक स्क्रीन येईल, जिथे तुम्हाला तुमच्या Paytm नंबरशी लिंक केलेली सर्व सक्रिय FASTag खाती दिसतील.
  • त्यानंतर पेजच्या खाली बॉटमला जाऊन ‘Help & Support’ वर क्लिक करा.
  • आता ‘Need help with non-order related queries?’ वर टॅप करा आणि ‘Queries related to updating FASTag profile’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ‘I want to close my FASTag’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

अशाप्रकारे तुमचे Paytm FASTag खाते निष्क्रिय करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, “29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर, प्रीपेड डिव्हाइसेस, वॉलेट्स, FASTags, NCMC कार्ड्स इ. कोणत्याही व्याज, कॅशबॅक किंवा परतावा व्यतिरिक्त ठेव किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अपला परवानगी दिली जाऊ नये. व्याज, कॅशबॅक किंवा परतावा कधीही जमा केला जाऊ शकतो.” असे RBI नवे एका निवेदनात म्हटले आहे.

Paytm चे स्पष्टीकरण

Paytm गेल्या 2 वर्षांपासून इतर बँकांना सहकार्य करत आहे. या स्थितीत कंपनी याकडे संपूर्ण लक्ष देत आहे. अशाप्रकारे कंपनीने स्पष्ट केले की वापरकर्ते फास्टटॅग सेवा देखील सुरू ठेवू शकतात. कंपनीने X म्हणजेच अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :