Important! mAadhaar ऍपचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक उपयुक्त फीचर्समुळे घरबसल्या होतील सर्व कामे

Updated on 25-Jul-2024
HIGHLIGHTS

UIDAI ने जुलै 2017 मध्ये Android आणि iOS दोन्हीसाठी mAadhaar ॲप्लिकेशन लाँच केले.

mAadhaar ऍपमध्ये युजर्स त्यांचे आधार कार्ड तपशील कधीही आणि कुठेही ऍक्सेस करू शकतात.

mAadhaar ऍपवरून युजर्स वैयक्तिक सहाय्यासाठी आधार सेवा केंद्रासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट्स बुक करू शकता.

mAadhaar: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने जुलै 2017 मध्ये Android आणि iOS दोन्हीसाठी mAadhaar ॲप्लिकेशन लाँच केले. या ऍपमध्ये युजर्स त्यांचे आधार कार्ड तपशील जपणे, लोकसंख्याशास्त्रीय तपशील अपडेट करणे, ऑफलाइन मोडमध्ये आधार तपशील पाहणे, सेवा प्रदात्यांसह eKYC किंवा QR कोड शेअर करणे आणि इतर अनेक महत्त्वाची कामे करू शकतात.

एवढेच नाही तर, mAadhaar ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रोफाइल देखील जोडू शकता. जेणेकरून एखादे वेळी महत्त्वाचे काम आल्यास तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या तपशिलांसाठी धावपळ करावी लागणार नाही. ते तुम्हाला तुमच्या फोनमध्येच सापडतील.

mAadhaar ॲपचे लाभ आणि फीचर्स:

  • mAadhaar ॲप तुम्हाला तुमचा आधार कार्ड तपशील ऑफलाइन मोडमध्येही पाहन्याची परवानगी देते.
  • mAadhaar ॲप ओळख पडताळणीसाठी सेवा प्रदात्यांसोबत कधीही eKYC आणि QR कोड शेअर करण्याची अनुमती देते.
  • ॲपमधील बायोमेट्रिक्स पर्याय निवडून तुम्ही तुमची आधार माहिती सुरक्षित ठेवू शकता.
  • डॉक्युमेंट्स प्रुफशिवाय तुम्ही तुमचा आधार तपशील सहजपणे अपडेट करू शकता.
  • हे ॲप तुम्हाला व्हर्च्युअल आधार ID तयार करण्यास अनुमती देते. सुरक्षिततेच्या कारणास्तव ज्यांनी त्यांचे आधार कार्ड लॉक केले आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
  • mAadhaar ऍप तुम्हाला अपडेट हिस्ट्री आणि ऑथेंटिकेशन रेकॉर्डबद्दल तपशीलवार माहिती देते.
  • या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रोफाइल देखील जोडू शकता आणि त्याच फोनवर त्यांचे आधार तपशील अपडेट करू शकता.
  • युजर्स वैयक्तिक सहाय्यासाठी आधार सेवा केंद्रासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट्स सहजपणे बुक करू शकतात.

mAadhaar ऍपवर प्रोफाइल कसे जोडता येईल?

  • सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसवर mAadhaar ॲप्लिकेशन डाउनलोड करा.
  • ऍप ओपन केल्यावर तुम्हाला मुख्य डॅशबोर्डच्या शीर्षस्थानी Register Aadhaar पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • टॅबवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला 4 अंकी पिन तयार करण्यास सांगितले जाईल.
  • तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश करण्यासाठी पिन किंवा पासवर्ड तयार करा.
  • आता आवश्यक आधार तपशील प्रविष्ट करा आणि कॅप्चा व्हेरिफाय करा.
  • यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
  • OTP प्रविष्ट करून सबमिट बटनवर क्लिक करा.
  • तुमची प्रोफाइल mAadhaar ॲपवर नोंदणीकृत होईल.
  • तुम्ही ‘Add Profile’ पर्याय वापरून तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी प्रोफाइल देखील तयार करू शकता. आता तुम्हाला mAadhaar प्रोफाइलमध्ये प्रवेश करायचा असेल तेव्हा तुम्हाला प्रथम चार-अंकी पिन/पासवर्ड द्यावा लागणार आहे.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :