सोशल मीडियावर जिकडे तिकडे Ghibli Style फोटोजचे ट्रेंड दिसत आहे.
यासह युजर्स स्वतःचे कार्टून अवतार तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
Ghibli Style Photo सोप्या पद्धतीने 'अशा' प्रकारे मोफत तयार करा.
Ghibli Style Photo: सध्या तुम्ही पाहतच असाल की, सोशल मीडियावर जिकडे तिकडे Ghibli Style फोटोजचे ट्रेंड आणि क्रेझ सुरु आहे. सर्व युजर्स स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबांचे मित्रमंडळींचे फोटो घिबली स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करत आहेत. यासह युजर्स स्वतःचे कार्टून अवतार तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हे तयार करण्यासाठी, पूर्वी लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT चे सशुल्क आवृत्ती वापरले जात होते. मात्र, आता वापरकर्ते चॅटजीपीटी सबस्क्रिप्शनशिवायही असे व्हायरल फोटो रूपांतरित करू शकतात.
ही सर्व्हिस आता अगदी मोफत आहे. यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही ऍपवर जाण्याची गरज नाही. तुम्ही आता ChatGPT च्या मोफत आवृत्तीचा वापर करूनही तुमचे फोटो घिबली पोर्ट्रेटमध्ये कन्व्हर्ट करू शकता. पुढीलप्रमाणे सोप्या पद्धतीने बनवा फोटोज अगदी मोफत-
Ghibli Style Photo ‘अशा’ प्रकारे करा तयार-
घिबली स्टाईल फोटो मोफत तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये ChatGPT ओपन करावे लागेल.
नंतर, ‘अटॅच’ आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या गॅलरीमधून जो फोटो तुम्हाला घिबली पोर्ट्रेटमध्ये रूपांतरित करायचा आहे, तो अपलोड करा.
फोटो अपलोड झाल्यानंतर, तुम्हाला फोटोच्या खाली ‘Please Convert This Photo to Ghibli Style’ अशी कमांड मिळेल.
तुम्ही ही कमांड देताच तुमची फोटो प्रक्रिया सुरू होईल. काही मिनिटांतच ChatGPT तुमचा सुंदर Ghibli Style चा फोटो तयार करेल.
तुम्हाला फक्त तो फोटो तुमच्या फोनमध्ये सेव्ह करायचा आहे. यानंतर तुम्ही हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यास सक्षम असाल.
मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, ChatGPT च्या मोफत आवृत्तीसह तुम्ही एका दिवसात फक्त एकच Ghibli Style फोटो कन्व्हर्ट करू शकता. पुढील फोटोसाठी तुम्हाला दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.