Lok Sabha Election 2024: तुमच्या फोनवर मिळेल निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, ‘अशा’प्रकारे चेक करा
Lok Sabha Election Results 2024 उद्या 4 जून रोजी येणार आहे.
4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
तुम्ही ECI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सर्व अपडेट्स मिळवू शकता.
Lok Sabha Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सामुर्ण सात टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. अखेर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एवढेच नाही तर, भारताच्या निवडणूक आयोगाने ECI च्या वतीने मतमोजणीची आकडेवारी देखील जारी केली आहे. त्यानंतर, आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा सुरु आहे.
तुम्हाला तुमच्या फोनवर लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह स्ट्रीमिंग आणि निकाल पाहायचे असतील. त्याबरोबरच, प्रत्येक अपडेट मिळवायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास रिपोर्ट तयार केला आहे.
Lok Sabha Election Results 2024 कसे आणि कुठे बघता येईल?
मतमोजणीची वेळ ECI (Election Commission of India) म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. तुम्ही ECI च्या अधिकृत वेबसाइटला म्हणजेच ‘http://result.eci.gov.in/’ ला भेट देऊन सर्व अपडेट्स मिळवू शकता. या व्यतिरिक्त, आपण रिअल-टाइममध्ये देशातील निकालांची स्थिती काय आहे, हे देखील पाहू शकतो. तुम्हाला या वेबसाइटवर सर्वात अचूक आणि अप टू डेट परिणाम पाहायला मिळतील.
Voter Helpline App
निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. तुम्ही निवडणूक आयोगाच्या Voter Helpline App चा वापर करूनही हा डेटा पाहू शकता. तुमच्या फोनमध्ये हे ॲप इन्स्टॉल करून तुम्ही लोकसभा निवडणुकीचे निकाल कुठेही, कधीही पाहू शकता. हे ॲप गुगल प्ले स्टोअरसह इन्स्टॉल करता येईल. ऍप इन्स्टॉल केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. त्यांनतर, या ॲपमध्ये तुम्हाला तपशीलवार निकाल मिळणार आहे.
होय, या App मध्ये तुम्हाला कोण जिंकत आहे? कोण आघाडीवर आहे? कोण मागे आहे? कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत? इ. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. यासह तुम्ही ॲपवर राज्यवार डेटा देखील पाहू शकता. या ॲपच्या मदतीने तुम्ही निवडणुकीचा निकाल कुठेही घरी, बाहेर, प्रवास करताना अगदी तुमच्या ऑफिसमध्ये बसूनही सहज पाहू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile