महत्त्वाची माहिती ! घरबसल्या ‘या’ ऍपद्वारे Aadhar मध्ये नाव आणि पत्ता बदला, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
घरबसल्या Aadhar कार्डवरील नाव आणि पत्ता बदला
हे काम mAadhaarApp द्वारे करता येईल
नाव आणि पत्ता अपडेट करण्यासाठी जाणून घ्या सोपी प्रक्रिया
आधार कार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आधारशिवाय कोणतेही महत्त्वाचे काम होणे शक्य नाही. त्यामुळे आधारमध्ये तुमची सर्व माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा घाईघाईने लोक आधार कार्डमध्ये चुकीचा तपशील टाकतात, ज्यामुळे त्यांना नंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुमच्या आधार कार्डमधील नाव आणि पत्त्याशी संबंधित तपशील चुकीचा असेल तर आता तुम्ही घरबसल्या सहजपणे दुरुस्त करू शकता.
हे सुद्धा वाचा : Redmi चा नवा फोन आज येणार भारतात ! 8GB रॅमसह केवळ 15 मिनिटांच्या चार्जवर फोन दिवसभर चालेल
होय. हे काम तुम्ही फक्त mAadhaar ऍपद्वारेच करू शकता. या ऍपद्वारे नाव, पत्ता, जन्मतारीख संबंधित तपशील दुरुस्त करणे खूप सोपे आहे. तुमच्यासाठी ही केवळ काही सेकंदांची बाब आहे. जाणून घ्या, घरबसल्या mAadhaar ऍपद्वारे तुम्ही नाव आणि पत्ता तपशील कसा अपडेट कराल…
mAadhaarApp द्वारे नाव आणि पत्ता 'अशा'प्रकारे बदला.
– यासाठी प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअरवरून mAadhaarApp डाउनलोड करावे लागेल. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून देखील ऍप डाउनलोड करू शकता.
> https://tinyurl.com/yx32kkeq (Android)
> https://tinyurl.com/taj87tg (iOS)
– यानंतर, तुम्हाला 'रजिस्टर माय आधार' वर क्लिक करावे लागेल आणि तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल, जिथे तुम्हाला OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला mAadhaarApp मध्ये लॉग इन करता येईल.
– लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ऍपमध्ये तुमचा आधार दिसेल, जिथे तुम्हाला तुमचे नाव आणि तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक दिसतील.
– यानंतर तुम्ही My Aadhaar वर क्लिक कराल, इथे तुम्हाला Aadhaar Update चा कॉलम दिसेल, इथे क्लिक करून तुम्हाला captcha टाकावा लागेल आणि Request OTP वर क्लिक करावे लागेल.
– OTP प्राप्त झाल्यानंतर, तुमच्याकडे अपडेट विंडो उघडेल जिथे तुम्ही नाव आणि पत्ता बदलून सबमिट करू शकता. कृपया लक्षात घ्या की, प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये आकारले जातील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile