Driving License मधील पत्ता बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग, ना RTO मध्ये जाण्याची गरज, ना एजंटचा खर्च
Driving License मधील पत्ता ऑनलाईन पद्धतीने बदला
आता RTO मध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही
mParivahan ऍपने घरबसल्या होईल काम
तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवत असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC असणे बंधनकारक आहे. त्यात वापरकर्त्याचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता यासारखे महत्त्वाचे तपशील असतात. हे तपशील चुकीचे असणे तुम्हाला महागात पडू शकते. खाली दिलेल्या माहितीप्रमाणे तुमच्या परवान्यामध्ये काही चूक असल्यास ती त्वरित दुरुस्त करा.
हे सुद्धा वाचा : आता ब्लॉक करण्याची गरज नाही, WHATSAPP वर 'अशा'प्रकारे हाईड करा DP आणि लास्ट सिन
जर तुम्ही तुमचे घर बदलले असेल तर तुमच्यासाठी DL मध्ये देखील पत्ता बदलणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल करण्यासाठी यापूर्वी तुम्हाला RTO (प्रादेशिक परिवहन कार्यालय) च्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता सरकारने ही प्रक्रिया आरामदायी केली आहे. परिवहन विभागाने mParivahan नावाचे ऍप आणि वेबसाइट सुरू केली आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचा पत्ता अपडेट करू शकता. जाणून घ्या, ड्रायव्हिंग लायसन्समध्ये ऑनलाईन पद्धतीने पत्ता कसा बदलावा…
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्समध्ये पत्ता कसा बदलायचा ?
स्टेप 1 : सर्वात अधिकृत वेबसाइट parivahan.gov वर जा आणि "ऑनलाइन सेवा" अंतर्गत ड्रॉप-डाउन मेनूमधून "ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा" वर क्लिक करा.
स्टेप 2 : ड्रॉप-डाउन मेनूमधून राज्य निवडा आणि नंतर "अप्लाइड फॉर चेंज ऑफ ऍड्रेस" चिन्हावर टॅप करा.
स्टेप 3 : "कंटिन्यू" वर क्लिक करा आणि नंतर "ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक" आणि "जन्मतारीख" प्रविष्ट करा.
स्टेप 4 : आता "DL डिटेल प्राप्त करा" वर क्लिक करा आणि ड्रायव्हिंग तपशील योग्यरित्या नमूद केले आहेत याची पुष्टी करून घ्या.
स्टेप 5 : आता, "RTO" निवडा आणि "पुढे जा" वर क्लिक करा.
स्टेप 6 : सर्व आवश्यक तपशील जोडा आणि "Change of Address on DL" च्या पुढील बॉक्सवर खूण करा.
स्टेप 7 : Permanent, Present, किंवा दोन्ही पत्ते निवडा आणि कन्फर्म करा.
स्टेप 8 : डिटेल्स सबमिट करा आणि प्रोसोसिंग फी पे करा. आता तुमचा नवीन पत्ता ड्रायव्हिंग लायसन्सवर अपडेट केला जाईल.
तुम्ही लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून ड्रायव्हिंग लायसन्सवर ऍड्रेस अपडेट स्टेटस ट्रॅक करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile