भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) विविध प्रकारच्या सेवा प्रदान करते. येथून तुम्हाला Aadhar cardमध्ये तुमचा पत्ता, फोटो, नाव इत्यादी बदलता येईल. जरी तुम्हाला आधारमध्ये नाव आणि फोटो बदलण्याबद्दल आधीच माहिती असेल, परंतु आज आम्ही तुम्हाला तुमच्या आधारमध्ये पत्ता कसा अपडेट करायचा ते सांगणार आहोत.
जर तुम्ही नवीन पत्त्यावर राहायला गेला असाल, तर तुम्ही तुमच्या आधार कार्डवर असलेला जुना पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकता. तुम्हाला फक्त UIDAI वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हे सुद्धा वाचा : Garmin कडून जबरदस्त सोलर स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स, वाचा डिटेल्स
स्टेप 1: सर्व प्रथम UIDAI वेबसाइटवर जा किंवा तुमच्या ब्राउझरमध्ये http://uidai.gov.in/ टाइप करा.
स्टेप 2: वेबसाइटच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या ड्रॉप-डाउन मेनूमधून My Aadhaar निवडा.
स्टेप 3: नंतर वेबसाइटच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या ड्रॉप-डाउन मेनूमधून 'अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन' पर्याय निवडा.
स्टेप 4: तुम्हाला लॉगिन करावे लागेल, ज्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. तसेच तुम्हाला कॅप्चा करावा लागेल.
स्टेप 5: आता तुमच्या नंबरवर एक OTP येईल जो तुम्हाला इथे टाकावा लागेल.
स्टेप 6: त्यानंतर तुम्हाला 'Update Aadhaar Online' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर त्यात एक पेज ओपन होईल
'Proceed to Update Aadhaar' वर क्लिक करा.
स्टेप 7: आता तुम्हाला काय अपडेट करायचे आहे ते निवडावे लागेल. यातून तुम्हाला पत्ता निवडावा लागेल. यानंतर पुन्हा एकदा Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा.