Uber ने दिली मोठी सुविधा, आता WhatsApp वरून कॅब बुक करता येणार, जाणून घ्या कसे ?
Uber ने दिली ग्राहकांना मोठी सुविधा
आता WhatsApp वरून कॅब बुक करता येणार
WhatsApp वरून कॅब बुक करताना तुमच्या गोपनीयतेचे काळजी घेतली जाईल
आता तुम्हाला इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp वर कॅब बुक करण्याची सुविधाही मिळणार आहे. होय, तुम्ही आता व्हॉट्सऍपवर Uber राइड्स बुक करू शकता. कॅब कंपनी उबर लवकरच व्हॉट्सऍपसाठी हा नवा पर्याय जारी करणार आहे. उबर ही नवी कॅब बुकिंग सेवा Delhi-NCRसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सुरू करणार आहे.
हे सुद्धा वाचा : Amazon Great Freedom Festival Sale मध्ये 'या' 32 इंच TV वर मिळतायेत विशेष सवलती, बघा यादी
या फीचरची पहिल्यांदा लखनऊ शहरात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चाचणी घेण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, तुम्हाला यापुढे Uber ऍप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची गरज राहणार नाही. तुम्ही फक्त व्हॉट्सऍप वापरून कॅब बुक करू शकता.
Uber च्या मते, जे वापरकर्ते व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक करतात, त्यांना उबेर ऍपवर थेट राइड बुक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुरक्षिततेसारखीच सुरक्षा मिळेल. व्हॉट्सऍपद्वारे कॅब बुक केल्यानंतरही, ड्राईव्हचे नाव आणि लायसन्स प्लेट अशी माहिती वापरकर्त्यांना पाठवली जाईल. तसेच पिकअप पॉईंटची माहिती लोकेशनच्या आधारे ड्रायवरला पाठवता येईल. तर ड्रायव्हरशी बोलत असतानाही युजर्सची ओळख गोपनीय ठेवली जाईल, म्हणजेच ड्रायव्हर यूजर्सचा व्हॉट्सऍप नंबर पाहू शकणार नाही.
कसे बुक कराल Uber कॅब ?
>. सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या WhatsApp वरील +91 7292000002 क्रमांकावर 'Hi' लिहून मेसेज करावा लागेल.
> यानंतर, तुम्हाला चॅटबॉटमध्ये पिकअप आणि ड्रॉप लोकेशन विचारले जाईल.
> लोकेशनबाबत माहिती दिल्यानंतर, तुम्हाला राइडची माहिती मिळेल. ज्यामध्ये भाडे आणि ड्रायव्हरची अपेक्षित आगमन वेळ दिसेल.
> एकदा तुम्ही 'OK' केले की तुम्हाला ड्रायव्हरची माहिती आणि OTP मिळेल. ड्रायव्हरला OTP देऊन तुम्ही राइड सुरू करू शकाल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile