IPL 2023 आजपासून सुरु होत आहे. IPL क्रिकेटविश्वातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. क्रिकेटप्रेमी वर्षभरापासून या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. IPL सामने तुम्हाला ऑनलाईन विना सदस्यता कुठे बघता येतील हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. मात्र, स्टेडियममध्ये बसून मॅच बघण्याची मजा काही औरंच असते. त्यामुळे यासाठी तुम्हाला ऑनलाईन तिकीट अगदी सोप्या रीतीने कसे करता येईल ते सांगणार आहोत.
तुम्हाला Paytm इनसाइडर आणि BookmyShow वरून ऑनलाईन तिकिटे बुक करता येतील. तिकिटे बुक करण्यासाठी पुढे दिलेली प्रक्रिया करा.
– सर्वप्रथम तुम्ही Paytm इनसाइडर ऍपवर जा.
– आता सर्च बॉक्समध्ये IPL सर्च करा.
– आता तुम्हाला ज्या सामन्यासाठी तिकीट हवे आहे ते निवडा.
– मॅच वर टॅप करा आणि आता Buy Now वर क्लिक करा.
– ड्रॉप-डाउन मेनूमधून किंमतीनुसार तिकिटे फिल्टर करा.
– दाखवलेल्या स्टेडियमच्या फोटोमधून floor/box निवडा.
– आता एक सीट निवडा आणि 'खरेदी' वर क्लिक करा
.
– शेवटी तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि पेमेंटसाठी पुढे जा.
– आता तुमच्या मोबाईल नंबर आणि मेल आयडीवर ई-तिकीट पाठवले जातील.
– BookmyShow ऍपवर जा.
– तुमचे शहर निवडा.
– 'द बेस्ट ऑफ लाईव्ह इव्हेंट्स' विभागात IPL 2023 वर टॅप करा.
– आता IPL सामने शोधा.
– 'बुक' वर टॅप करा, सीट निवडल्यानंतर, पुढे जा.
– आता 'बुक' वर टॅप करा आणि तिकिटांच्या होम डिलिव्हरीसाठी तुमचा पिनकोड एंटर करा, नंतर पेमेंट करा.
– तिकिटे तुमच्या नंबरवर आणि तुमच्या घरी पाठवली जातील.