महत्त्वाचे ! Gmail वर Spam Email मुळे वैतागलात? बघा अगदी सोपा मार्ग
Gmail वर Spam Emai 'अशा'प्रकारे ब्लॉक करा
Spam Email मुळे जास्त वैतागण्याची आवश्यकता नाही
पुढीलप्रमाणे सोप्या टिप्सचा अवलंब करा
सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील 150 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते Gmail वापरत असल्याने हॅकर्स इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह Gmail वर देखील ऍक्टिव्ह झाले आहेत. हॅकर्स फिशिंग वेबसाइट आणि स्पॅमच्या माध्यमातून Gmail वरील डेटा चोरत आहेत आणि फसवणूक करत आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला जीमेलच्या अशाच काही टिप्स देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पॅम ईमेल सहजपणे थांबवू शकणार आहात. एवढेच नाही, तर ऑनलाइन फसवणुकीपासूनही तुमचा बचाव होईल.
हे सुद्धा वाचा : Motorola Edge Ultra 30: भारतातील पहिला 200MP कॅमेरा फोन 'या' दिवशी लाँच होणार
ईमेल unsubscribe करा
तुम्ही वारंवार आणि अनावश्यक वेबसाइट ईमेलचे सदस्यत्व रद्द करू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यात या खात्यांकडून ईमेल प्राप्त होणार नाहीत. ईमेलचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी, तुम्हाला स्पॅम ईमेल निवडावे लागेल आणि नंतर डिलीटच्या बाजूला 'Report spam and unsubscribe' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला त्या ईमेल आयडीवरून ईमेल येणे बंद होईल.
स्पॅम ईमेलसाठी फिल्टर वापरा
तुम्ही स्पॅम ईमेल शोधण्यासाठी आणि रिमूव्ह करण्यासाठी Gmail फिल्टर देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला Gmail च्या सर्च बॉक्समध्ये जाऊन unsubscribe टाईप करावे लागेल. यानंतर, Gmail तुमच्या स्क्रीनवर सर्व अनसब्स्क्राइब केलेल्या आणि स्पॅम मेलची संपूर्ण यादी दाखवेल. तुम्हाला हे सर्व ईमेल निवडावे लागतील आणि तीन डॉट्स (मोअर) वर क्लिक करा आणि 'फिल्टर मॅसेज लाइक दीस ऑप्शन' निवडा. यामध्ये, तुम्हाला स्पॅम ईमेल आपोआप हटवण्याच्या पर्यायासह अनेक पर्याय मिळतात. लक्षात ठेवा की तुम्ही ही यादी एकदा तपासून पहा, जेणेकरून तुमचे महत्त्वाचे ईमेल डिलीट होणार नाहीत.
दोन Emai id वापरा
ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दोन भिन्न ईमेल आयडी वापरणे. ज्यांना प्रायमरी आणि सेकंडरी इमेल आयडी म्हणता येईल. म्हणजेच, जेव्हा तुम्ही ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग किंवा इतर कोणत्याही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्ही सेकंडरी ईमेल आयडी वापरू शकता. प्रायमरी ईमेल स्मार्टफोन, बँक आणि अधिकृत कामासाठी वापरता येईल. याच्या मदतीने तुम्ही प्रायमरी ईमेलला ऑनलाइन स्पॅमपासून प्रोटेक्ट करता येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile