How to: तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला? Paytm, PhonePe आणि GPay खाती घरी बसून ब्लॉक करा, अन्यथा होईल नुकसान। Tech News 

How to: तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला? Paytm, PhonePe आणि GPay खाती घरी बसून ब्लॉक करा, अन्यथा होईल नुकसान। Tech News 
HIGHLIGHTS

सध्या लोक एकापेक्षा जास्त UPI पेमेंट ऍप्लिकेशन वापरतात.

तुमचा फोन चोरीला गेल्यास सर्व UPI खाती ब्लॉक करणे गरजेचे आहे.

बघुयात Paytm, PhonePe आणि GPay खाते निष्क्रिय करण्याची प्रक्रिया

जगभरात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढतच जात आहे. त्याबरोबरच टेक्नॉलॉजीमुळे यात अधिकच नाविन्याची बदल होत आहेत. बहुधा असे दिसून येते की, लोक एकापेक्षा जास्त UPI पेमेंट ऍप्लिकेशन वापरतात. एकीकडे यामुळे जीवन सुकर झाले आहे, तर दुसरीकडे त्याचे काही तोटेही आहेत. कारण हे सर्व पेमेंट Apps (Paytm, PhonePe आणि GPay इ.) तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतात. जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर यामुळे तुमचे मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होण्याचा धोका नेहमीच असतो.

हे सुद्धा वाचा: Affordable! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G24 स्मार्टफोन ग्लोबली लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

paytm

अशा परिस्थितीत, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रथम सर्व UPI खाती ब्लॉक करणे गरजेचे आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला तुमची PhonePe, Google Pay आणि Paytm खाती कशी ब्लॉक करू शकता याबाबत संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.

PhonePe खाते कसे निष्क्रिय करावे?

फोन चोरीला गेल्यास PhonePe वापरकर्ते हेल्पलाइन क्रमांक 08068727374 वर कॉल करू शकता. तुम्ही कॉल करता तेव्हा, तुम्हाला खालील तपशील ग्राहक सपोर्ट एक्झिक्युटिव्हला प्रदान करावे लागतील:

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
  • PhonePe वर नोंदणीकृत ईमेल आयडी
  • शेवटचे पेमेंट तपशील जसे प्रकार, मूल्य इ.
  • लिंक केलेल्या बँक खात्यांची नावे
  • पर्यायी मोबाईल नंबर

अशाप्रकारे तुमचे PhonePe खाते तात्पुरते निष्क्रिय केले जाईल. त्यानंतर तुम्हाला नुकसानापासून वाचण्यासाठी दुसरे मार्ग शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

phonepe
phonepe

Paytm खाते कसे निष्क्रिय करावे?

मोबाईल चोरीला गेल्यास तुमचे सिम ब्लॉक केल्यानंतर, पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइन – 0120 4456456 वर कॉल करा. आता, ‘रिपोर्ट लॉस किंवा वॉलेटचा अनधिकृत वापर, डेबिट कार्ड किंवा सेविंग्स अकाउंट’ पर्याय निवडा. यानंतर ‘लॉस्ट फोन’ पर्याय निवडा. आता तुमच्या हरवलेल्या मोबाईलचा नंबर टाका. त्यानंतर, अखेर ‘ब्लॉक पेटीएम अकाउंट’ पर्याय निवडा.

Google Pay खाते कसे निष्क्रिय करावे?

Google Pay खाते निष्क्रिय करण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-419-0175 द्वारे Google Pay किंवा ZeePay शी संपर्क साधा. एखाद्या स्पेशलिस्ट बोलण्याचा पर्याय निवडा आणि तुमचे खाते ब्लॉक करण्यासाठी सर्व तपशील द्या.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo