Smartphone वर बळजबरीने आलेल्या जाहिराती बघून वैतागलात ? ‘अशा’ प्रकारे कायमचे बंद करा

Updated on 25-May-2023
HIGHLIGHTS

फोनवर काही बघताना सारख्या जाहिरात येतात?

या वारंवार येणाऱ्या जाहिरात बघून तुम्ही कंटाळलात ?

त्रास देणाऱ्या जाहिराती बंद करण्यासाठी पुढील प्रक्रिया बघा.

स्मार्टफोन वापरताना तुमच्या लक्षात आले असेल की, कोणतीही वेबसाईट किंवा ऍप ओपन केले की लगेच जाहिराती येतात. सारख्या सारख्या येणाऱ्या जाहिरातींमुळे खरंच वैताग येतो. विशेषतः जेव्हा तुम्ही काही महत्त्वाचे काम करत असाल, तर ही एक मोठी समस्या असते. पण आता तुम्हाला यासाठी अधिक काळजी करण्याची गरज नाही, कारण या जाहिराती कायमच्या ब्लॉक केल्या जाऊ शकतात. कसे ते बघुयात – 

खरं तर तुम्ही तुमच्या फोनवर एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल किंवा विषयाबद्दल सर्च केले असता, त्या संबंधित जाहिराती यायला सुरुवात होते. म्हणजेच आपल्या शोधाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार जाहिराती येत असतात. उदा. एखाद्या शॉपिंग ऍपवर तुम्ही वॉच किंवा ज्वेलरी बघितली असेल. तर नंतर काही काळ तुमच्या सोशल मीडियावर किंवा इतर साईट्सवर तुम्हाला वॉच किंवा दागिन्यांच्या जाहिराती दिसतील. 

तर या जाहिराती बंद करण्यासाठी एक अप्रतिम उपाय आहे. ऍड्स बंद करण्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया फॉलो करा : 

जाहिरात बंद करण्यासाठी प्रक्रिया :

– सर्वप्रथम तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. 

– आता 'Manage your google account' ओपन करा.

– यानंतर तुम्हाला 'Ads' किंवा 'Advertisement' पर्याय सर्च करावा लागेल. तुमच्‍या फोनच्‍या ऑपरेटिंग सिस्‍टमवर अवलंबून, जसे की 'Google Ads' या 'Ads Settings' अशा नावानी ते मिळेल. 

– ओपन केल्यानंतर तुम्ही जाहिरात सेटिंग्ज पेजवर पोहोचल्यावर, तुम्हाला 'Opt out of personalized ads' या 'Turn off interest-based ads' अशाप्रकारचे पर्याय मिळतील. ते निवडा किंवा सक्षम करा.

 – काही फोनमध्येही तुम्हाला जाहिरात आयडी रीसेट केल्यानंतर फोन रीस्टार्ट करावा लागेल.

अशाप्रकारे वरील प्रक्रिया केल्यास तुम्हाला वारंवार होणाऱ्या जाहिरातींचा त्रास होणार नाही. 

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :