महत्त्वाचे ! लहान मुले YouTube प्ले करतात, ‘अशा’प्रकारे ब्लॉक करा ऍडल्ट कंटेंट, बघा सोप्या स्टेप्स…

Updated on 23-Aug-2022
HIGHLIGHTS

'अशा'प्रकारे YouTube वर ऍडल्ट कंटेंट ब्लॉक करा

Restricted Mode वापरून तुम्हाला हे काम सहजपणे करता येईल

जाणून घ्या, डेस्कटॉप आणि मोबाईलवर हा मोड कसा ऑन कराल

YouTube सर्व वयोगटातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाला YouTube वर व्हिडिओ बघायला आवडते. लहान मुले जेव्हा यूट्यूब प्ले करतात, तेव्हा पालकांना नेहमीच भीती असते की चुकून कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ ओपन होऊ नये. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही YouTube किड-फ्रेंडली बनवू शकता. कसे ते जाणून घ्या… 

हे सुद्धा वाचा : BSNL चा अप्रतिम प्लॅन! 200 रुपयांपेक्षा कमी दरात मिळतील दररोज 2GB डेटा आणि मोफत कॉल-SMS

खरं तर, YouTube Restricted Modeसह येतो, जेणेकरून ते प्रत्येक वयोगटासाठी अनुकूल बनवता येईल. हा विशेष मोड प्लॅटफॉर्मवरील सर्व ऍडल्ट कंटेंट ब्लॉक करतो, ज्यामुळे ते मुलांसाठी अनुकूल बनते. मात्र, YouTube दावा करत नाही की, सर्व ऍडल्ट कंटेंट या मोडद्वारे फिल्टर केली जाईल. कारण काहीवेळा हे फिल्टर अचूक नसतात. परंतु तरीही, या मोडद्वारे आपल्याला प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात मुलांसाठी अनुकूल बनवता येईल.

जर तुमचे मूल एखादे विशिष्ट उपकरण वापरत असेल आणि तुम्हाला त्याच्यासमोर कोणताही ऍडल्ट कंटेंट येऊ नये असे वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला Restricted Mode कसे वापरू शकता हे सांगणार आहोत. डेस्कटॉप आणि स्मार्टफोनवर हा मोड चालू करण्यासाठी बघा सोप्या स्टेप्स… 

1. डेस्कटॉपवर YouTube प्रतिबंधित मोड कसा चालू/बंद करायचा:

– वेब ब्राउझरवर YouTube.com उघडा.

– वरच्या उजव्या कोपर्‍यात तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.

– प्रोफाइल मेनूमधून, " Restricted Mode" वर क्लिक करा.

-"Active Restricted Mode" पर्यायासाठी टॉगल चालू करा.

असे केल्याने तुमच्या डेस्कटॉपच्या वेब ब्राउझरसाठी प्रतिबंधित मोड म्हणजेच Restricted Mode ऍक्टिव्हेट होईल.

2. मोबाईलवर YouTube प्रतिबंधित मोड कसा सुरु करायचा-

– तुमच्या स्मार्टफोनवर YouTube ऍप उघडा.

– YouTube सेटिंग्जमध्ये जनरल मेनूवर जा.

– Restricted Mode पर्यायावर जा. 

-"Activate Restricted Mode" साठी टॉगल ऑन करा. 

कृपया लक्षात घ्या की, वेगवेगळ्या डिवाइससाठी हा मोड स्वतंत्रपणे चालू करावा लागेल. त्यामुळे, तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर ऍप वापरत असल्यास, तुम्हाला हँडल करावे लागेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :