अप्रतिम युक्ती ! YouTube वर व्हिडिओ बघताना Ads त्रास देतात ? ‘अशा’प्रकारे सोप्या पद्धतीने करा ब्लॉक

अप्रतिम युक्ती ! YouTube वर व्हिडिओ बघताना Ads त्रास देतात ? ‘अशा’प्रकारे सोप्या पद्धतीने करा ब्लॉक
HIGHLIGHTS

YouTube वर जाहिरातींमुळे वैतागलात ?

ऍड ब्लॉक करण्यासाठी येथे बघा खास युक्ती

YouTube Premium चे सदस्यत्व घेऊनही ऍडफ्री व्हीडिओ बघता येतील

YouTube हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. येथे युजरला सर्व प्रकारचे व्हिडिओ मिळतात. YouTube वर व्हिडिओ पाहताना सर्वात त्रासदायक म्हणजे नको असलेल्या जाहिराती मधेच येतात. यामुळे नक्कीच युजरची चीड चीड होते, पण आता काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक खास युक्ती आणली आहे, ज्याद्वारे तुम्ही YouTube व्हिडिओंच्या मध्यभागी जाहिराती ब्लॉक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही खास युक्ती… 

हे सुद्धा वाचा : Flipkart Big Billion Days Sale 2022 : इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर 80% पर्यंत सूट, 'या' दिवशी सुरू होईल सेल

> सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर Google Chrome उघडावे लागेल. यानंतर ऍडब्लॉकर एक्स्टेंशन क्रोम शोधा.

> आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला AdBlock — सर्वोत्तम ऍड ब्लॉकर — Google Chrome दिसेल. यावर क्लिक करा.

> यानंतर पुन्हा एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये Add to Chrome लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा. 

>  क्लिक केल्यावर आता एक फाईल डाउनलोड होईल. मग आपोआप इन्स्टॉल केली जाईल. नसल्यास, नंतर ते स्वतः इन्स्टॉल करा.

> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, Chrome बंद करा. त्यानंतर ते पुन्हा उघडा. त्यानंतर जेव्हा तुम्ही गुगल क्रोमचा URL बार पाहाल तेव्हा तुम्हाला एक Extension दिसेल. यावर क्लिक करा.

>  येथे AdBlock-best ad blocker दिसेल. यावर क्लिक करा. असे केल्याने YouTube वर येणाऱ्या जाहिराती ब्लॉक होतील. आता तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्हिडिओ पाहण्यास सक्षम असाल. 

> याव्यतिरिक्त, यामध्ये युजर्स युट्युबचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत. जर तुम्हाला 1 महिन्यासाठी YouTube Premium चे सदस्यत्व घ्यायचे असेल तर तुम्हाला 139 रुपये खर्च करावे लागतील. 3 महिन्यांसाठी 399 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 1,290 रुपये द्यावे लागतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo