सध्या स्मार्टफोनमध्ये आग आणि स्फोट होण्याच्या घटना वाढत आहेत. अशा अपघाताचे कारण कधी मॅन्युफॅक्चरिंग दोष असते तर कधी वापरकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात. वीज पुरवठ्यात समस्या आल्यावरच सामान्यतः इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि स्मार्टफोनला आग लागते. फोन चार्ज करण्यासाठी अनेक वेळा चार्जर आणि जास्त पॉवर असलेले लोकल चार्जर वापरले जातात. या कारणास्तव वीज पुरवठ्यातही समस्या निर्माण होते आणि फोनची बॅटरी स्फोटासारखी परिस्थिती निर्माण होते.
चला तर बघुयात अशा काही चुका, ज्या टाळून तुम्ही स्मार्टफोन ब्लास्ट होण्यापासून वाचवू शकता…
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Realme 10 pro Series भारतात लाँच, किमंतही कमी…
1.
सतत गेम खेळल्याने फोन खूप गरम होतो आणि त्याचा फोनच्या बॅटरीवरही परिणाम होतो. गेमिंग दरम्यान, फोनचा प्रोसेसर वेगाने काम करतो आणि फोन खूप गरम होतो. अशा स्थितीत अतिउष्णता हे फोन स्फोटाचे कारण बनू शकते. जर तुमचा फोन देखील गेमिंग दरम्यान जास्त गरम होत असेल तर फोन थोडा वेळ बंद करा आणि लगेच चार्जिंगला लावू नका.
2.
फोनची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होण्यापूर्वी चार्जिंगला ठेवा आणि फोन 100% चार्ज करणे टाळा. म्हणजेच, बॅटरी 30 % होण्याआधीच तुम्ही फोन चार्ज करावा. कारण जेव्हा बॅटरी कमी असते तेव्हा फोन जास्त गरम होतो, ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.
3.
चार्जिंग दरम्यान फोन वापरू नका, असे केल्याने फोन ब्लास्ट होण्याची शक्यताही वाढते. खरं तर, स्मार्टफोन चार्जिंगच्या वेळी थोडा हिट होतो आणि या वेळी फोन वापरल्याने फोनवर अचानक अतिरिक्त दबाव येतो. अशा वेळी बॅटरीचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते.
4.
तुम्ही लोकल चार्जर वापरून तुमचा स्मार्टफोन चार्ज करत असाल, तर तत्काळ ते करणे थांबवा. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होते आणि बॅटरी ब्लास्ट होण्याचे हे एक प्रमुख कारण असू शकते. खरं तर, लोकल चार्जरमध्ये पॉवरचा प्रवाह कमी-जास्त होतो, ज्यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीवर दबाव येतो आणि यामुळे कधी कधी बॅटरीचा स्फोट होतो. त्यामुळे फोनच्या मूळ चार्जरचा वापर करा.