Amazon आणि Flipkart Sale दरम्यान फसवणूक कशी टाळायची? लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या Tips। Tech News
ऑनलाईन शॉपिंग दरम्यान फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.
सेलदरम्यान ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक कशी टाळावी?
टर्म्स आणि कंडिशन, सेलर आणि पेमेंट करताना काळजी घ्या.
सणासुदीचा हंगाम सुरु झालेला आहे, त्या निमित्त दोन्ही प्रसिद्ध Online Shopping प्लॅटफार्म Amazon आणि Flipkart नवे देखील आपले वर्षातील सर्वात मोठे फेस्टिवल सेल सुरु केले आहे. मात्र, ऑनलाईन शॉपिंग दरम्यान फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. सेलदरम्यान ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक कशी टाळावी? यासाठी आम्ही काही खास Tips तुम्हाला या रिपोर्टमध्ये सांगणार आहोत.
सेलरबद्दल संपूर्ण माहिती बघा.
ऑनलाइन शॉपिंग सेलमध्ये असे होत नाही की, जर तो Apple फोन असेल तर थेट Apple च तो विकत असेल आणि जर तो Samsung फोन असेल तर तो थेट कंपनीकडून येतोय. अशात फसवणुकीच्या घटना हमखास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट्सच नाही, तर त्याच्या सेलरबद्दल माहिती बघणे देखील गरजेचे आहे.
टर्म्स आणि कंडिशन्स वाचा.
ग्राहक ऑफर्ससाठी आवश्यक असलेल्या ‘टर्म्स आणि कंडिशन’कडे दुर्लक्ष करतात. म्हणजेच, Amazon UPI द्वारे पेमेंट करताना तुम्हाला काही % कॅशबॅक मिळत असेल, तर त्याची एक अट अशी आहे की, UPI ID मॅन्युअली सबमिट करू नये. ऑनलाइन शॉपिंगमध्ये अशा अनेक अटी आणि नियम जारी केले जातात, जे खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आणि समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास परिणाम नंतर भोगावे लागतात.
पेमेंट करताना जास्त काळजी घ्या.
ऑनलाईन शॉपिंग करताना हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की, तुम्ही केलेले पेमेंट पूर्णपणे सुरक्षित आहे. बँक कार्ड, UPI आयडी आणि वॉलेट इत्यादी पूर्णपणे सुरक्षित ठेवा आणि तुमचे वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करू नका. म्हणजेच तुम्ही कॅश-ऑन-डिलिव्हरी अंतर्गत वस्तू खरेदी करत असल्यास पेमेंट करताना डिलिव्हरी बॉयला तुमचे बँकिंग तपशील देऊ नका. पेमेंट रिक्वेस्ट आल्यास रक्कम नीट तपासूनच पेमेंट करा.
ऑफर योग्यप्रकारे समजून घ्या.
तुम्ही शॉपिंग साइटचे होम पेज उघडताच, तुम्हाला 80 टक्क्यांपर्यंत सूट किंवा 15,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिसेल. पण इथे ‘UP To’ कडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. लोक फक्त ऑफर बघून लवकरात लवकर शॉपिंग करतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile