भारीच की ! Gmail वरील नको ते मेल्स आपोआप होतील डिलीट, ‘ही’ अप्रतिम युक्ती वापरा…

भारीच की ! Gmail वरील नको ते मेल्स आपोआप होतील डिलीट, ‘ही’ अप्रतिम युक्ती वापरा…
HIGHLIGHTS

Gmail वरील नको ते मेल्स आपोआप डिलीट होणार

'फिल्टर्स फॉर ऑटो-डिलीट' फीचरमुळे हे काम सोपे होणार

नको असलेल्या मेल्सपासून सुटका करण्यासाठी अप्रतिम युक्ती

ऑफिशियल कामाकरता Gmail एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका अप्रतिम  ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या gmail अकाउंटवर येणारे सर्व अनावश्यक मेल्स आपोआप डिलीट होतील. चला जाणून घेऊयात या फीचरबद्दल सविस्तर माहिती…

हे सुद्धा वाचा : Oppo चा नवा पॉवरफुल फोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळेल 50MP कॅमेरा आणि बरंच काही

नको त्या mails ने वैताग येतो 

कोणत्याही ऍपमध्ये प्रवेश करण्यासाठी, सर्वप्रथम आपल्याला त्यात आपला E-mail Id  प्रविष्ट करावा लागेल. त्यामुळे वर्क मेल्स व्यतिरिक्त, स्पॅम मेल्स Gmail वरील खूप जागा घेतात आणि काहीवेळा त्या निरुपयोगी मेलमुळे कामाचे मेल्स आपल्याकडून चुकतात. या लेखात आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे Gmail चे हे स्पॅम मेल्स आपोआप डिलीट होतील. 

'अशा' प्रकारे स्पॅम मेल्स आपोआप डिलीट होतील

नको असलेले मेल्स आपोआप डिलीट करण्यासाठी, जीमेल तुम्हाला 'फिल्टर्स फॉर ऑटो-डिलीट' हे विशेष फिचर देतो. हे फीचर कसे वापरता येईल ते बघुयात… 

'या' स्टेप्स फॉलो करा

> सर्व प्रथम तुमचे Gmail खाते उघडा. आता सर्च बारमध्ये तुम्हाला 'फिल्टर' पर्याय दिसेल. 

> असेही होऊ शकते की तुम्हाला सर्च बारमध्ये 'फिल्टर'चा पर्याय दिसत नाही. असे झाले तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला सेटिंग्समध्ये 'Filters and Blocked Addresses' च्या टॅबमध्ये दिसेल.

>  त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फक्त 'Create Filter' वर क्लिक करावे लागेल. 

> 'फिल्टर' पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्वात वर 'From' लिहिलेले दिसेल.

>  त्यात तुम्हाला नको असलेल्या ईमेलचा फक्त नाव किंवा ईमेल ऍड्रेस टाइप करा. अशा प्रकारे, ते मेल ऍड्रेस निवडले जातील, ज्यांचे मेल तुम्हाला आवडत नाहीत.

आणि अशाप्रकारे तुम्हाला नको असलेले मेल्स आपोआप दिलीत होत जातील. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo