PAN 2.0: नव्या पॅन कार्डसाठी ‘अशा’प्रकारे ऑनलाईन अप्लाय करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया

PAN 2.0: नव्या पॅन कार्डसाठी ‘अशा’प्रकारे ऑनलाईन अप्लाय करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया
HIGHLIGHTS

आयकर विभागाने अलीकडेच PAN 2.0 प्रकल्प सादर केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे विद्यमान पॅन कार्ड QR कोड नसतानाही वैध असतील.

QR कोड असलेले ई-पॅन कार्ड अर्जामध्ये नोंदणीकृत ईमेल आयडीवर विनामूल्य पाठवले जाईल.

PAN 2.0: परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच PAN अलॉट आणि अपडेट प्रक्रिया सुधारण्यासाठी आयकर विभागाने PAN 2.0 सादर केला आहे. QR कोड असलेले ई-पॅन कार्ड अर्जामध्ये नोंदणीकृत ईमेल आयडीवर विनामूल्य पाठवले जाईल, असते सांगण्यात आले आहे. मात्र, लक्षात घ्या की, करदात्यांना फिजिकल पॅन कार्डसाठी काही शुल्क भरावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे विद्यमान पॅन कार्ड QR कोड नसतानाही वैध असतील.

दरम्यान, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला पॅन 2.0 बद्दल माहिती देणार आहोत. होय, पॅन कार्डच्या डिजिटल ऍप्लिकेशनपासून ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत.

Also Read: How to: आता Instagram वर देखील पाठवता येईल Live लोकेशन, जाणून घ्या अगदी सोपी प्रक्रिया

PAN 2.0 साठी अर्ज कोण करू शकतो?

तुम्ही सध्या पॅनकार्ड धारक असल्यास, तुम्ही नवीन पॅन कार्ड मिळविण्यासाठी सहज पात्र आहात. जर तुम्ही नवे अर्जदार आहात, तर तुम्हाला पॅन कार्ड असण्याचे मूलभूत पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे. त्याबरोबरच, वैध ओळख आणि पत्ता पुरावा आवश्यक आहे. पॅन 2.0 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

PAN 2.0 साठी अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी युनिफाइड पोर्टलवर जा.
  • आता तुमचे नाव, जन्मतारीख आणि संपर्क माहिती यासारखे आवश्यक तपशील भरा.
  • खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती सबमिट करा:
  1. Aadhaar कार्ड, Voter ID, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
  2. ऍड्रेस प्रूफ: युटिलिटी बिल, रेंट ऍग्रिमेंट्स किंवा बँक स्टेटमेंट.
  3. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पासपोर्ट.
  • तुम्ही प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि पोर्टलद्वारे सुरक्षितपणे अर्ज सबमिट करा.

दुसरी पद्धत: पॅन 2.0 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा:

सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पॅन NSDL किंवा UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड (UTIITSL) द्वारे जारी केला गेला आहे का? हे तपासावे लागेल. ही माहिती तुमच्या पॅन कार्डच्या मागील बाजूला मिळेल.

NSDL द्वारे ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा:

  • सर्वप्रथम NSDL e-PAN पोर्टलवर जा.
  • येथे तुम्हाला तुमचा पॅन, आधार आणि जन्मतारीख टाकावी लागेल. त्यानंतर OTP कसा मिळवायचा ते निवडा.
  • पुढे जाण्यासाठी 10 मिनिटांच्या आत OTP एंटर करा. पॅन जारी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत तीन पर्यंत विनंत्या मोफत आहेत. त्यानंतरच्या विनंत्यांची किंमत जीएसटीसह 8.26 रुपये आहे.
  • पेमेंट केल्यानंतर, ई-पॅन 30 मिनिटांच्या आत तुमच्या नोंदणीकृत आयडीवर Email केला जाईल.
PAN 2.0 - PAN Card Update

UTIITSL द्वारे ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा:

  • सर्वप्रथम तुम्हाला UTIITSL ई-पॅन पोर्टल https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard वर जावे लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा पॅन, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • जर कोणताही ईमेल नोंदणीकृत नसेल तर प्रकल्प अधिकृतपणे लाँच झाल्यानंतर, तुम्हाला ते पॅन 2.0 अंतर्गत अपडेट करावे लागेल.
  • गेल्या 30 दिवसांत जारी केलेल्या ई-पॅनसाठी मोफत. यानंतर विनंती खर्च रु. 8.26 आहे.
  • यानंतर, तुमचा ई-पॅन नोंदणीकृत Email ID वर PDF स्वरूपात येईल.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo