Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया 

Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया 
HIGHLIGHTS

Loksabha Election 2024 आता जवळ आले आहे.

प्रत्येक नागरिकाला भारतात 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.

घरबसल्या ऑनलाईन Voter ID Card साठी अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती

आपणा सर्वांना माहितीच आहे की, Loksabha Election 2024 आता जवळ आले आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला भारतात 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. जर तुम्ही या वर्षी 18 वर्षांचे झाले असाल तर तुम्ही मतदान केले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम मतदार यादीमध्ये तुमचे नाव असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच, तुमच्याकडे अधिकृत मतदार ओळखपत्र म्हणजेच Voter ID Card असणे अनिवार्य आहे.

हे सुद्धा वाचा: त्वरा करा! लोकप्रिय Google Pixel 8 स्मार्टफोनवर मिळतोय तब्बल 10,000 रुपयांचा Discount, बघा सर्वोत्तम डील। Tech News

तुम्ही या वर्षी मतदान करण्यास पात्र असाल तर, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन Voter ID Card साठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात घरबसल्या Voter ID Card साठी अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे:

ऑनलाईन Voter ID Card साठी अप्लाय कसे करावे?

तुम्ही Voter ID Card साठी अर्ज करताना आधी तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही हे तपासावे लागेल. यासाठी तुम्हाला पुढीलप्रमाणे काही गोष्टींची खात्री करून घ्यावी लागेल.

know how to easily change address in your voter id card
  • Voter ID Card साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल, तर तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता.
  • तुम्ही मतदार क्षेत्रात वास्तव्यास असणे आवश्यक आहे. खरं तर, वेगवेगळ्या राज्य सरकारांनी त्याची वेगळी व्याख्या केली आहे.

महत्त्वाचे दस्तऐवज:

ओळखीचा पुरावा (Identity Proof): तुमच्या फोटोसह आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक पासबुक इ.

पत्त्याचा पुरावा (Address Proof ): आधार कार्ड, पासपोर्ट, वीज बिल, रेशन कार्ड, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट इ.

जन्मतारीख पुरावा (DOB Proof): यामध्ये तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, स्कुल लिविंग सर्टिफिकेट, पासपोर्ट इ.

how to apply voter id card online 1
how to apply voter id card online

Voter ID Card साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम National Voter’s Service Portal वर जा.
  • त्यानंतर Register New Users वर जा. जर तुम्ही विद्यमान वापरकर्ते असाल तर थेट लॉग इन करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडून पुढे जावे लागेल आणि त्यानंतर New Registration (Form 6) सिलेक्ट करा.
  • येथे तुम्हाला हा फॉर्म 6 पूर्णपणे भरावा लागेल, तुम्हाला तुमचे योग्य नाव, पत्ता, जन्मतारीख इ. महत्त्वाचे तपशील योग्य भरावे लागतील.
  • आता तुम्हाला सूचनेप्रमाणे वर नमूद केलेली कागदपत्रे स्कॅन करून येथे अपलोड करावी लागतील.
  • याबरोबरच तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटोदेखील अपलोड करावे लागेल. अशाप्रकारे तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करू शकता. यासह तुम्हाला तुमच्या Voter ID Card चे स्टेटस देखील तपासता येईल.

लक्षात घ्या की, तुम्हाला Voter ID Card साठी ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येईल. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयात किंवा तुमच्या क्षेत्रात सुरू असलेल्या त्यांच्या बूथवर जावे लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo