घरबसल्या चुटकीसरशी ऑनलाईन PAN Card साठी अर्ज करा! फॉलो करा स्टेप बाय स्टेप ‘ही’ सोपी प्रक्रिया

Updated on 11-Nov-2024
HIGHLIGHTS

साधारणतः पॅन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला सेतू केंद्र किंवा कार्यालयात जावे लागते.

तुम्ही फक्त 10 मिनिटांत घरबसल्या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता.

E-PAN Card करिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

आपणा सर्वांना माहितीच आहे की, PAN Card चा वापर आता सर्रास झाला आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कामांसाठी किंवा तुमचे ओळखपत्र म्हणून तुम्ही PAN Card चा वापर करू शकता. विशेष म्हणजे बँकिंग व्यवहारात पॅन कार्डचा वापर केला जातो. जर एखाद्याला मोठी रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर, त्यावेळी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे.

साधारणतः पॅन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला सेतू केंद्र किंवा कार्यालयात जावे लागते. पण आम्ही तुम्हाला 10 मिनिटांत पॅन कार्ड कसे बनवायचे त्याबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही फक्त 10 मिनिटांत घरबसल्या बनवलेले पॅन कार्ड मिळवू शकता. मात्र, तुम्हला काही अटी वर शर्थींचे पालन देखील करावे लागेल.

Also Read: Important Tips: काही तासांतच Smartphone मधील दैनंदिन डेटा संपतो? ‘या’ सोप्या टिप्ससह जास्त काळ टिकेल डेटा

Pan Card

E-PAN Card

ऑनलाईन पॅन कार्ड म्हणजेच ePan कार्ड बनवण्याची पहिली अट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ई-पॅन कार्ड फक्त आधार कार्डद्वारे बनवता येईल. ई-पॅन कार्डबाबत कोणत्याही प्रकारची समस्या यायला नको. पॅन कार्डच्या जागी ई-पॅन कार्ड देखील वापरता येतो. तुम्हाला माहितीच आहे की, पॅन कार्डवर एक विशेष क्रमांक असतो. हा विशेष क्रमांक तुमचा पॅन ओळखतो.

E-PAN Card साठी अर्ज कसे करावे?

E-PAN Card करिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करावी लागेल:

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जावे लागेल.
  • आता तुम्हाला पेज स्क्रोल करावे लागेल, जिथे बॉटमला instant E-PAN कार्डचा पर्याय दिसेल.
  • एक नवीन पेज ओपन होईल, ज्याच्या डाव्या बाजूला Get New e-PAN चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या आधारचे 12 अंक टाकावे लागतील.
pan card
  • त्यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या ‘I confirm that’ ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला हा OTP टाकून पडताळणी करावी लागेल.
  • यानंतर ई-मेल आयडी टाका आणि पॅन कार्डसाठी आवश्यक तपशील भरून घ्या.
  • फॉर्म भरल्यानंतर काही वेळाने तुम्हाला कन्फर्मेशन नंबर मिळेल, ते तपासून घ्या. माहिती योग्य असल्यास डाउनलोड पर्यायाद्वारे तुम्हाला पॅन क्रमांक मिळेल. हे पॅन तुम्ही नेहमीच्या पॅनप्रमाणे वापरू शकता.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, ई-पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाइटवर जावे लागेल. जिथे तुम्हाला ‘चेक स्टेटस/डाउनलोड पॅन’ ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. अशाप्रकारे पॅन कार्ड PDF मध्ये डाउनलोड होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :