महत्त्वाचे ! तुमच्या Android आणि iPhone वर Wi-Fi कॉलिंग कसे सुरु करावे? बघा सोपी प्रक्रिया

Updated on 09-Oct-2022
HIGHLIGHTS

Android आणि iPhone वर Wi-Fi कॉलिंग सुरु करा.

Wi-Fi कॉलिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमकुवत नेटवर्कमध्येही स्पष्टपणे बोलता येईल.

बघा अगदी सोपी प्रक्रिया

नेहमीच आपल्याला कमकुवत नेटवर्कमुळे फोनवर बोलण्यात त्रास होत असतो, परंतु जर Wi-Fi सिग्नल उत्तम असेल तर ही समस्या दूर होते. वास्तविक तुम्ही सेल्युलर नेटवर्कऐवजी Wi-Fi नेटवर्कवरून कॉल करू शकता. आता सर्व फोनवर Wi-Fi  कॉलिंग करता येईल अशी सुविधाही मिळत आहे. Wi-Fi कॉलिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमकुवत नेटवर्कमध्येही तुम्ही सहज आणि स्पष्टपणे बोलू शकता. चला तर मग फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे करायचे ते जाणून घेऊयात…

हे सुद्धा वाचा : Amazon सेलचा तिसरा टप्पा! स्टायलिश लुकसह जबरदस्त इयरबड्स खरेदी करा, बघा यादी

Android फोनमध्ये Wi-Fi कॉलिंग कसे सक्षम करावे?

खरं तर सर्व फोनची सेटिंग वेगळी असते, म्हणून आम्ही तुम्हाला काही फोन मॉडेल्ससह Wi-Fi कॉलिंगची पद्धत सांगणार आहोत.

Google Pixel 

सेटिंग्ज वर जा > नेटवर्क आणि इंटरनेट वर क्लिक करा > कॉल आणि SMS निवडा.

याशिवाय तुम्ही सेटिंगमध्ये Wi-Fi कॉलिंग शोधू शकता.

OnePlus 

सेटिंग्ज > मोबाइल नेटवर्क > सिम 1

तुम्ही सेटिंग्जमध्ये Wi-Fi कॉलिंग शोधू शकता.

वाय-फाय कॉलिंग ऑन करा.

SAMSUNG आणि इतर कंपन्यांचे फोन

– फोन ऍप उघडा. 

– तीन डॉट्सवर क्लिक करा. 

– आता सेटिंग उघडा. 

– येथून Wi-Fi कॉलिंग ऑन करा.

iPhones मध्ये Wi-Fi कॉलिंग कसे चालू करावे?

सेटिंग्ज > फोन > Wi-Fi कॉलिंग वर क्लिक करा. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :