रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2022 मध्ये UPI Lite सेवा सुरू केली. ही UPI पेमेंट प्रणालीचे थोडे सोपे वर्जन आहे, जी छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी जारी केली गेली होती. Original UPI द्वारे तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंतचे दैनंदिन व्यवहार करू शकता, तर UPI Lite मध्ये 200 रुपयांपेक्षा कमी दैनंदिन व्यवहार करू शकता.
हे सुद्धा वाचा: Jio 5G Plans 2024: कंपनीचे टॉप 5 Best प्लॅन्स, Unlimited बेनिफिट्ससह OTT सब्स्क्रिप्शन देखील उपलब्ध
अशाप्रकारे, जे वापरकर्ते दररोज किमान UPI व्यवहार करतात त्यांच्यासाठी UPI Lite हा सर्वोत्तम पर्याय आहे. विशेष बाब म्हणजे UPI Lite च्या छोट्या व्यवहारांसाठी वापरकर्त्यांना UPI पिन टाकण्याची देखील गरज नाही. ही सोपी प्रणाली लाँच झाल्यापासून अनेक पॉप्युलर पेमेंट ऍप्सने ही सर्व्हिस आपापल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली आहे. ज्यामध्ये Google Pay, PhonePe आणि Paytm Appsचा समावेश आहे.
दरम्यान, जर तुम्ही PhonePe वापरकर्ते असाल आणि तुम्हाला लहान व्यवहारांसाठी UPI Lite सेवा वापरायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला PhonePe वर UPI Lite सेवा ऍक्टिव्ह करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सोपी प्रोसेस सांगणार आहोत.