मोबाईल वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाल्याच्या बातम्या येतचं असतात. अशा परिस्थितीत, डिजिटल जगात टिकून राहण्यासाठी सुरक्षितता आणि गोपनीयतेबाबत जागरुक राहणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या युजर्सची सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेबाबत अनेक अपडेट्सही जारी करत आहेत. टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे देखील असेच एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुमचे सोशल मीडिया अकाउंट अतिशय सुरक्षित असेल.
हे सुद्धा वाचा : 50MP सेल्फी कॅमेरा आणि कलर चेंजरसह Vivo चा 5G फोन लाँच, जाणून घ्या किंमत
तुम्हीही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल आणि तुमचे खाते सुरक्षित ठेवायचे असेल, तर हे जाणून घेणे तुमचंसाठी महत्त्वाचे आहे. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या टू स्टेप व्हेरिफिकेशन फिचरबद्दल सांगणार आहोत…
टू स्टेप व्हेरिफिकेशन फिचरच्या मदतीने तुमचे खाते मोठ्या प्रमाणात सुरक्षित केले जाते. हे तुमच्या खात्याला सुरक्षिततेचा आणखी एक अतिरिक्त स्तर प्रदान करते, ज्यामुळे खात्याची सुरक्षा अधिक मजबूत होते. म्हणजेच, कोणी तुमचा मोबाईल हॅक केला किंवा इतर कोणतीही फसवणूक करून आयडी पासपोर्ट मिळवला, तरीही त्याला लॉगिन करणे अवघड जाईल.
> टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया खात्यावर लॉग इन करावे लागेल.
> खाते लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि Security and Login पर्यायावर टॅप करावे लागेल.
> यानंतर तुम्हाला Two-Factor Authentication वर टॅप करावे लागेल आणि त्यानंतर Edit वर जावे लागेल.
> यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन मेथड सिलेक्ट करून Enable वर टॅप करा.
> यानंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह होईल.