देशात 1 ऑक्टोबरपासून हायस्पीड मोबाइल इंटरनेट 5G सेवा सुरू झाली आहे. या दिवशी Airtel ने भारतात पहिल्यांदा 5G सेवा सुरू केली. भारती एअरटेलने 1 ऑक्टोबरपासून देशातील टॉप आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी आणि कोलकाता यांचा समावेश आहे.
या शहरांमधील रोलआउटमुळे लोकांच्या फोनमध्ये 5G सिग्नलही येऊ लागले आहेत. तुम्हीही या शहरांमध्ये राहत असाल आणि आतापर्यंत तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क येत नसेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला 5G नेटवर्क ऍक्टिव्ह करण्याचा सोपा मार्ग सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा : 32 इंच स्क्रीन TV खरेदी करायचंय? Amazon GIF सेलमध्ये पहा सर्वोत्तम पर्याय…
> सर्वप्रथम तुमच्या 5G स्मार्टफोनची सेटिंग ओपन करावी लागेल आणि येथून सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्क्स किंवा कनेक्शन पर्यायावर जा.
> येथून सिम कार्ड निवडा आणि Preferred Network Type वर जा.
> नेटवर्क मोडमधून तुम्हाला 5G (ऑटो) नेटवर्क निवडावे लागेल.
> यानंतर, तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध होईल आणि तुमच्या फोनच्या स्टेटस बारमध्ये 5G नेटवर्क चिन्ह देखील तुम्हाला दिसेल.
> या नेटवर्कवर तुम्हाला पूर्वीपेक्षा खूप चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, 5G इंटरनेटसाठी तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
Airtel 5G मार्च 2023 पर्यंत देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये विस्तारित केले जाईल आणि मार्च 2024 पर्यंत देशभरात Airtel 5G नेटवर्क असेल.