‘भुज’पासून ते ‘डार्लिंग्स’पर्यंत OTT वर कितीमध्ये विकले ‘हे’ बॉलिवूड चित्रपट? कार्तिक आर्यनने केला ‘धमाका’

Updated on 08-Aug-2022
HIGHLIGHTS

OTT वर कोट्यवधींमध्ये विकले 'हे' बॉलिवूड चित्रपट

शाहरुखचा 'जवान' 120 कोटींना विकला

कार्तिकने केला 'धमाका'

लॉकडाऊनच्या काळापासून OTT ला भरपूर तेजी आली आहे. प्रेक्षकांसाठी केवळ एक नाही तर अनेक OTT  पर्याय उपलब्ध आहेत. आता देशातील आणि जगातील कोणताही सिनेमा तुम्हाला घरबसल्या पाहता येईल. हॉलिवूड असो किंवा बॉलीवूड किंवा साऊथ आता प्रेक्षकांना भरपूर कंटेंट उपलब्ध आहे. 5 ऑगस्टला आलिया भट्टचा 'डार्लिंग्ज' चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. याआधीही अनेक चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित झाले आहेत, ज्यासाठी मोठी रक्कम मोजली गेली आहे.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Amazon GFF सेलमध्ये रेफ्रिजरेटर्सवर मिळतायेत आकर्षक डिल्स, बघा यादी

शाहरुखचा जवान 120 कोटींना विकला

शाहरुख खानने याआधी चाहत्यांना तीन आगामी चित्रपटांची भेट दिली होती, ज्यामध्ये एक 'जवान' चित्रपट देखील आहे. जवान या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर नयनतारा या चित्रपटात तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

 जवान हा चित्रपट 2 जून 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात थलापथी विजय आणि दीपिका पदुकोण यांचाही कॅमिओ असू शकतो. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, NETFLIXने चित्रपटाचे OTT अधिकार 120 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

जाणून घेऊयात अशाच काही निवडक चित्रपटांच्या OTT किमतीबद्दल… 

कार्तिकने केला 'धमाका'…

गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटांमध्ये कार्तिक आर्यनने 'धमाका' चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. GQindia ने वेगवेगळ्या स्त्रोतांचा हवाला देत, OTT वर कोणता चित्रपट कोणत्या किंमतीत विकला गेला आहे, हे सांगितले. या यादीत यापूर्वी प्रदर्शित झालेल्या बड्या सेलिब्रिटींच्या चित्रपटांची देखील नावे आहेत. यादी पहा…

डार्लिंग्स: 80 करोड रुपये, धमाका: 135 करोड रुपये, लक्ष्मी: 125 करोड रुपये, भुज- द प्राइड ऑफ इंडिया: 110 करोड रुपये

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :