Honor कडून मोठ्या डिस्प्ले आणि पावरफुल प्रोसेसर असलेला नवीन टॅबलेट लाँच, जाणून घ्या किंमत

Updated on 21-Sep-2022
HIGHLIGHTS

Honor Pad 8 नवीन टॅबलेट भारतात लाँच

4 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये टॅबलेटचा 4 GB व्हेरिएंट 19,999 रुपयांच्या किंमतीला उपलब्ध होणार

दीर्घ विश्रांतीनंतर Honor ने भारतात पुनरागमन केले आहे. कंपनीने भारतात आपला Honor Pad 8 लाँच केला आहे. हा टॅब भारताआधी जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला होता. Honor Pad 8 मध्ये 12-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आणि Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. डिस्प्लेसह 2K रिझोल्यूशन समर्थित आहे. यासोबतच ब्लूटूथ v5.1 सह OTG सपोर्ट उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा : मस्तच ! Vivo चा 'हा' 5G फोन आता एका नव्या रंगात लाँच, जाऊन घ्या फीचर्स आणि स्पेक्स

Honor Pad 8 चे स्पेसिफिकेशन्स

Honor Pad 8 मध्ये 12-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, जो 1200×2000 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 87 टक्के बॉडी टू स्क्रीन रेशोसह येतो.  यामध्ये Android 12 आधारित MagicUI 6.1 देण्यात आला आहे. तसेच, यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेजसह येतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Honor Pad 8 सह 5 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासाठी सपोर्ट आहे.

टॅब्लेटमध्ये 7250mAh बॅटरी आहे, जी 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. Honor Histen आणि DTS: X Ultra टॅबमध्ये 8 स्पीकर्ससह समर्थित आहेत. त्याची डिझाईन युनिबॉडी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.1 आणि OTG चे सपोर्ट आहे.

Honor Pad 8 ची किंमत

हा टॅबलेट सिंगल ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. Honor Pad 8 दोन रॅम व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 4 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 6 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डे 2022 रोजी टॅबलेट खरेदी करता येईल. सेलमध्ये, टॅबलेटचा 4 GB व्हेरिएंट 19,999 रुपयांच्या किंमतीला आणि 6 GB रॅम व्हेरिएंट 21,999 रुपयांच्या किंमतीला खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :