Cyber फसवणुकीवर सरकारची मोठी कारवाई! 6 लाख फोन नंबर ब्लॉक, 800 ॲप ब्लॉक, वाचा डिटेल्स 

Cyber फसवणुकीवर सरकारची मोठी कारवाई! 6 लाख फोन नंबर ब्लॉक, 800 ॲप ब्लॉक, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

गृह मंत्रालयाने सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

गृह मंत्रालयाच्या सायबर विंग 14C ने ही कारवाई केली आहे.

NCRP पोर्टलला 2023 मध्ये 1 लाखांहून अधिक फसवणुकीच्या तक्रारी मिळाल्या.

आजकाल सर्वत्र सायबर फसवणुकी वाढतच चालल्या आहे. जिकडे तिकडे Cyber फसवणुकीमुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. ताज्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, गृह मंत्रालयाच्या सायबर विंग 14C ने ही कारवाई केली आहे. सायबर विंगने सायबर फसवणुकीशी संबंधित सुमारे 6 लाख नंबर्स बंद केले आहेत. तर, 800 ॲप्सही ब्लॉक करण्यात आले आहेत.

Also Read: Nothing Ear (open) Launched: आकर्षक डिझाईनसह नवे इयरबड्स भारतात दाखल, भारी स्मार्टफोनच्या किमतीत बड्स लाँच

Cyber-Fraud

65 हजार URL देखील ब्लॉक

एवढेच नाही तर, सायबर विंगच्या आदेशावरून सायबर फसवणुकीत गुंतलेले 65 हजार URL देखील ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याबरोबरच, सायबर विंगने गेल्या 4 महिन्यांत फसवणुकीत गुंतलेली 3.25 लाख खाती फ्रिज आहेत. 3,400 हून अधिक सोशल मीडिया ग्रुप्स देखील बंद करण्यात आले आहेत. सायबर फसवणुकीपासून साडेआठ लाख लोकांना वाचवल्याचा गृहमंत्रालयाचा दावा आहे.

वर्षभरात ‘एवढे’ फसवणुकीची प्रकरणे दाखल

वर सांगितल्याप्रमाणे, गृह मंत्रालयाने 2018 मध्ये 14C विंग तयार केली होती. हे गृह मंत्रालयाच्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभागात केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तयार केले गेले आहे. हे सर्व राज्यांशी जोडले जाते आणि सायबर गुन्ह्यांचे निरीक्षण करते. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, NCRP पोर्टलला 2023 मध्ये 1 लाखांहून अधिक फसवणुकीच्या तक्रारी मिळाल्या आहेत. या प्रकरणांमध्ये सुमारे 17 हजार FIR नोंदवण्यात आले आहेत.

Indian cyber-fraud specialist lawyer loses Rs 1 crore in online scam

सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी या विंगने राष्ट्रीय स्तरावर समन्वय केंद्राची निर्मिती केली आहे. याशिवाय, सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी सहज नोंदविण्यास विंग मदत करते. सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी एजन्सींना मदत सुद्धा करते. ही शाखा लोकांना असे गुन्हे टाळण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते. त्याबरोबरच, ही विंग बनावट डिजिटल प्लॅटफॉर्मची देखील माहिती काढून त्यावर कारवाई करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo