आयकर रिटर्न भरण्यासाठी आणि बँकेसोबत मोठे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य झाले आहे. 2022-23 या वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे, म्हणजेच तुम्ही त्यानंतर ITR दाखल करू शकणार नाही. आता जर तुमचे पॅन कार्ड कुठेतरी हरवले किंवा पावसात खराब झाले तर तुम्हाला ITR भरताना अडचणी येऊ शकतात.
पण, आता काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमचे पॅन कार्ड हरवल्यास तुम्ही सहजपणे ई-पॅन कसे डाउनलोड करू शकता.
हे सुद्धा वाचा : 'या' तारखेला 'ब्रह्मास्त्र' चित्रपट फक्त 75 रुपयांमध्ये सिनेमागृहात पाहता येणार!
खरं तर, आयकर रिटर्न भरताना पॅन कार्डशी संबंधित समस्या लक्षात घेता, भारत सरकारने त्वरित पॅन ऑनलाइन देण्याची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा 24 जुलैपासून सुरू करण्यात आली असून ती पूर्णपणे मोफत आहे. ऑनलाइन ई-पॅन काही मिनिटांत डाउनलोड केले जाऊ शकते.
> ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी, प्रथम प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टल incometax.gov.in वर जा.
> यानंतर Instant e-PAN option मधून New e-PAN पर्याय निवडा.
> दिलेल्या विंडोमध्ये तुम्हाला पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
> यानंतर, Terms and Conditionsचा पर्याय एक्सेप्ट करा.
> या प्रक्रियेवर क्लिक केल्यावर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
> OTP एंटर करा आणि तपशील तपासून सबमिट बटनवर क्लिक करा.
> यानंतर ई-पॅन कार्डची PDF तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. या ई-पॅनची PDF डाउनलोड करा आणि सेव्ह करा.