सध्या बचाव कार्यात 16 सैन्यदलाच्या टीम्स, 42 नौदलाच्या टीम्स आणि NDRF च्या 28 टीम्स चा समावेश आहे.
केरळ मध्ये पुरामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. पथानामथिट्टा, यार्नाकुलम, अलाप्पुज्हा आणि थ्रिस्सुर मध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे शहरे आणि गावे बुडाली आहेत.
केंद्र सरकार, राज्य सरकार, वॉलंटियर्स आणि NGO मिळून या नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले नुकसान कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत. गूगल वर इमरजेंसी आणि हेल्पलाइन नंबर्सची यादी आहे. गूगल चे पीपल ट्रॅकर पण तिथे सक्रीय आहेत. सध्या बचाव कार्यात 16 सैन्यदलाच्या टीम्स, 42 नौदलाच्या टीम्स आणि NDRF च्या 28 टीम्स चा समावेश आहे.
कन्नूर च्या कलेक्टर ने आर्थिक मदती पेक्षा जास्त खालील आवश्यक वस्तूंची मदत मागितली आहे.
जेवण बनवण्याचे तसेच खाण्यासाठी लागणारी भांडी उदा. प्लेट्स, ग्लास इत्यादी.
घरातील फर्नीचर (खुर्च्या, टेबल इत्यादी )
तांदूळ तसेच अन्य खाद्य पदार्थ ठेवण्यासाठी भांडी
बूट-चप्पला
मग, बाल्टी
तुम्ही या वस्तु इथे पाठवू शकता:- Control Room, Collectorate, Kannur – 670002, Phone no. 9446682300, 04972700645
तसेच, इद्दुकी च्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर ने पण वरील वस्तूंची मदत मागितली आहे.
तुम्ही या वस्तू या पत्त्यावर पाठवू शकता: District Collector Idukki, Idukki Collectorate, Painavu P O, Kuyilimala, Idukki, PIN – 685603
केरळ चॅप्टर ऑफ इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर्स ने IT मिशन च्या सपोर्ट ने वेबसाइट लॉन्च केली आहे जी सरकारी विभागांना, वालंटियर्स आणि लोकांना साथ देईल. वेबसाइट keralarescue.in नावाने शोधता येईल.
केरळ च्या मुख्यमंत्री, Pinarayi Vijayan ने आपला डिजास्टर रिलीफ फंड सुरू केला आहे तुम्ही तुमचे योगदान पाठवू शकता. तुम्ही चेक किंवा DD खालील पत्यावर मेल करु शकता.
The Principal Secretary (Finance) Treasurer, Chief Minister’s Distress Relief Fund, Secretariat, Thiruvananthapuram – 695001
ऑनलाइन डोनेशन साठी खाली डिटेल्स दिले आहेत.
अकाउंट नंबर: 67319948232 बँक: भारतीय स्टेट बँक ब्रँच: सिटी ब्रँच, थिरुवनंतपुरम IFSC Code: SBIN0070028 PAN: AAAGD0584M खाते धाराकाचे नाव: CMDRF
त्याचबरोबर तुम्ही साउथ इंडियन बँक, फेडरल बँक आणि SBI वर उपलब्ध UPI किंवा QR कोड्स च्या माध्यमातून पण तुमचे योगदान देऊ शकता.