घालता येणा-या अशा(फिटनेस बँड्स आणि स्मार्टवॉचेस) डिवायसेसचा गेल्या काही वर्षांपासून ट्रेंड सुरु आहे. हे तुम्हाला हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग आणि त्यासंबंधी महत्त्वांच्या सेवांविषयी माहिती देतात. ह्या आठवड्यात मात्र ह्या हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगचा CES 2016 मध्ये पाठ फिरवली गेली आणि काही नवनिर्मित असे प्रोडक्ट सादर करण्यात आले.
फूड कॅलेरीज सेंसर : CES 2016 मध्ये किकस्टार्टर प्रोजेक्ट २०१४ चे प्रोडक्ट्स ग्राहकांना आश्चर्यचकित करणारे होते. ग्राहकांचा प्रोटोटाइपपासून ते अंतिम प्रोडक्टपर्यंतचा शारीरिक प्रवास कसा असेल हे आता संपुर्ण जगाला पाहायला मिळेल. तरी अन्नपदार्थांसाठी SCiO ही स्टार ट्रेक ट्रीकॉर्डर सर्वाज जवळची गोष्ट आहे. हे खूपच लहान आणि पॉकेटमध्ये ठेवता येईल असे पुर्ण स्केलचे स्पेक्ट्रॉमीटर व्हर्जन आहे. हा आपण आपल्या स्मार्टफोनशी जोडल्यास एखादे अन्नपदार्थ आपल्यासाठी हेल्थी आहे की अनहेल्थी ते सांगतो. तसेच त्या संबंधित अन्नपदार्थात किती कॅलेरीज, चरबी, प्रोटीन आणि कार्ब्स आहेत ते ही सांगतो.
टेक्नो ट्रेडमिल्स: आपल्या जुन्या कार्डियो मशिन्सपेक्षा आकर्षक असा टेक्नो ट्रेडमिल्स CES 2016 मध्ये सादर करण्यात आला. हा टेक्नोजिम रनिंग म्यूजिक फीचरसह येतो, जो ट्रेडमिलवरील तुमच्या चालणे/जॉग करणे/धावणे ह्या गोष्टींना त्यांच्या वेगाप्रमाणे साधर्म्य साधणारे संगीत आपोआप प्ले करतो. त्यामुळे यूजर्सला प्रत्येक वेळी गाणे बदलण्याची आवश्यकता नाही. ट्रेडमिल तुमच्यासाठी ते स्वत: करेल.
तसेच जर तुमचे म्युजिकनेही ट्रेडमिलवर जॉगिंग करण्याचा मूड होत नेसल, तरीही काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी ह्या ट्रेडमिलवर iFit नावाचे आणखी एक उपकरण बसविण्यात आले आहे. ज्यात ६० इंचाच्या कर्व्ड OLED स्क्रीन तुमच्या समोर अाहे. हा तुम्हाला एखाद्या समुद्रावर किंवा कोणत्यातरी देशातील रस्त्यांवर जॉगिंग करत आहे असे भासवतो. कंपनीचा दावा आहे की, हे ट्रेडमिल गुगल मॅप्स एकीकरणाद्वारे हे करु शकतो. ह्याचाच अर्थ आता तुम्हाला प्रत्येक दिवशी तुमच्या स्वप्नातल्या ठिकाणी जॉगिंग करत असल्याचा अनुभव मिळेल.
स्मार्ट वेटिंग स्केल: आपण ह्याआधी Withings आणि फिटबिट वेटिंग स्केल्सविषयी बोललो आहोत. पण ह्या वर्षी CES मध्ये फिनलँडवर आधारित असलेला डिवाइस ‘पोलर’सादर करण्यात आला.९९ डॉलरमध्ये मिळणारा हा पोलर बॅलेंस स्मार्ट वेटिंग स्केल हा यावर्षीचा खूप महत्त्वाचा असा डिवाइस मानला जात आहे. हा दिसायला खूपच लहान आणि सुंदर आहे.हा तुमचे वजन तुमच्या मोबाईलवर दाखवतो. एवढेच नव्हे तर हा तुमचा फिटनेस कोच म्हणूनही काम करतो. जेव्हा जेव्हा त्यावर उभे राहाल तर हा तुम्हाला तुमच्या वजनाचे प्रमाण आणि ते समतोल करण्यासाठी तुम्हाला किती आणि कशा प्रकाराच्या व्यायामाची गरज आहे ते सांगतो.
इन्फ्रारेड थर्मोमीटर: दिसायला खूपच सुंदर असलेला हा थर्मोमीटर इन्फ्रारेडद्वारा तुमच्या बॉडीला स्कॅन करुन तुमच्या शरीरातील तापमान मोजतो. त्यासाठी तुम्हाला हे डिवाइस तुमच्या कपाळाच्या बाजूला ठेवावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तो वायब्रेट होईपर्यंत थांबावे लागेल, त्यानंतर तुम्हाला त्वरित तुमच्या शरीरातील तापमान तुमच्या OLED डिस्प्लेवर दिसेल.
पेट(पाळीव प्राणी) हेल्थ मॉनिटर: जेव्हा आपण हेल्थ टेक ह्या विषयावर बोलत आहोत तेव्हा ते फक्त माणसांसाठी आहे असे कोणी सांगितले. त्यांच्याबरोबर प्राण्यांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या पेटनेट स्मार्टबाउलमधून त्यानं खाद्य द्यावे लागेल, जे तुमच्या मांजर किंवा कुत्रा यांसाख्या प्राण्याचे डाएट मॉनिटर करते. हे पेटबाउल तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी योग्य प्रमाणात खाद्य देत आहात की नाही ते सांगते, जर त्यात कमी किंवा जास्त प्रमाणात खाद्य असल्यास त्याची त्वरित तुम्हाला माहिती देतो.