Important! आताच पूर्ण करा महत्त्वाचे पेमेंट्स, ‘या’ युजर्ससाठी UPI सर्व्हिस आज रात्री राहणार बंद

Important! आताच पूर्ण करा महत्त्वाचे पेमेंट्स, ‘या’ युजर्ससाठी UPI सर्व्हिस आज रात्री राहणार बंद
HIGHLIGHTS

HDFC बँकेच्या UPI सर्व्हिसेस आज रात्री राहणार बंद

या सेवा काही तास बंद राहणार असल्या तरीही त्यानंतर ते पूर्ववत होतील.

HDFC बँकेने ग्राहकांना या कालावधीत होणारे व्यवहार सर्व्हिसेस बंद करण्यापूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला दिला

जर तुमचेही देशातील सर्वात मोठ्या HDFC बँकेत खाते असेल, तर तुम्हाला पुढील दोन दिवस UPI समस्यांना सामोरे जावे लागू शकते, कारण या दिवसांमध्ये UPI सर्व्हिसेस काम करणार नाहीत. लक्षात घ्या की, या सेवा काही तास बंद राहणार असल्या तरीही त्यानंतर ते पूर्ववत होतील. UPI व्यतिरिक्त, इतर सर्व काही ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध असेल. HDFC बँकेने सांगितले की, त्यांची युनिफाइड पेमेंट इंटरफेस UPI सेवा 5 आणि 23 नोव्हेंबर रोजी सिस्टम देखभालीसाठी तात्पुरती उपलब्ध असणार नाही.

upi services

HDFC बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या सर्व्हिसेस 5 नोव्हेंबरला 2 तास आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी 3 तासांसाठी उपलब्ध नाहीत. बँकेने सांगितले की तुमचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी आम्ही आवश्यक प्रणाली (सिस्टम) देखभाल करत आहोत.

Also Read: अनिवासी भारतीय NRIs आता UPI वापरून भारतात पैसे ट्रान्सफर करू शकतात, जाणून घ्या कसे?

HDFC बँकेच्या UPI सर्व्हिस या वेळेत उपलब्ध नाहीत

  • 05 नोव्हेंबर 2024 12:00 AM IST ते 02:00 AM IST (2 तास)
  • 23 नोव्हेंबर 2024 रोजी 12:00 AM IST ते 03:00 AM IST पर्यंत (3 तास)
upi services
upi services

पुढील सर्व्हिसेस देखील राहणार बंद

या काळात अनेक सुविधा ग्राहकांना मिळणार नाहीत:

  • HDFC बँक चालू आणि बचत खाती किंवा रुपे क्रेडिट कार्डवर कोणतेही वित्त आणि गैर-वित्त UPI व्यवहार होणार नाहीत.
  • HDFC बँक UPI हँडल वापरणाऱ्या सर्व बँक खातेधारकांसाठी HDFC मोबाइल बँकिंग ॲप, GPay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance, MobiKwik आणि Credit.Pay वर आर्थिक आणि गैर-आर्थिक UPI व्यवहारांना देखील परवानगी दिली जाणार नाही.
  • याव्यतिरिक्त, HDFC बँकेद्वारे अधिग्रहित केलेल्या व्यापाऱ्यांचे सर्व UPI व्यवहार देखील निलंबित राहतील.

HDFC बँकेने ग्राहकांना या कालावधीत होणारे व्यवहार सर्व्हिसेस बंद करण्यापूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यावेळी कोणतीही अडचण येऊ नये. म्हणजेच याचा फटका फक्त HDFC बँकेच्या ग्राहकांनाच बसणार आहे. इतर बँकांचे ग्राहक पूर्वीप्रमाणे कोणत्याही अडचणीशिवाय UPI सेवा वापरण्यास सक्षम असतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo