Har Ghar Tiranga 2023: साईटवर फिचर होणार भारतीय ध्वजासोबतचा तुमचा सेल्फी, ‘अशा’प्रकारे पोस्ट करा

Har Ghar Tiranga 2023: साईटवर फिचर होणार भारतीय ध्वजासोबतचा तुमचा सेल्फी, ‘अशा’प्रकारे पोस्ट करा
HIGHLIGHTS

15 ऑगस्ट 2023 रोजी भारत आपला 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.

पुन्हा एकदा भारतात 'हर घर तिरंगा 2023' मोहीम सुरू

'हर घर तिरंगा' वेबसाइटवर तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी फीचर करण्याची प्रक्रिया करा.

Har Ghar Tiranga 2023: उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 रोजी भारत आपला 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. भारताचे आजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा' निमित्त भारतात 'हर घर तिरंगा' मोहीम सुरु केली होती.  त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतात  'हर घर तिरंगा 2023' मोहीम सुरू झाली आहे.

 13 ऑगस्ट रोजी म्हणजेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडियावरील डिस्प्ले पिक्चर बदलून या मोहिमेची सुरुवात केली. यासोबतच त्यांनी ‘हर घर तिरंगा अभियाना’मध्ये सहभागी होऊन देशवासीयांना त्यांचे प्रोफाइल पिक्चर देखील बदलण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर तुम्ही भारतीय ध्वजासोबतचा तुमचा सेल्फी देखील Har Ghar Tiranga च्या डेडिकेटेड साईटवर पोस्ट करू शकता. चला तर मग वेळ न घालवता सविस्तर माहिती जाणून घ्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 13 ऑगस्ट रोजी त्यांच्या X म्हणजेच ट्विटर हँडलचा डिस्प्ले पिक्चर म्हणजेच प्रोफाइल फोटो बदलून तिरंग्याच्या फोटो ठेवला आहे. भारतीय ध्वजाचा हा फोटो टाकून PM मोदींनी भारतात 'हर घर तिरंगा 2023' मोहीम सुरू केली आहे, जी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सुरु असणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच नाही, तर हर घर तिरंगा मोहिमच्या डेडिकेटेड साइटवर तिरंग्यासह तुमचे सेल्फी आणि व्हिडिओ पोस्ट करू शकता.

 'हर घर तिरंगा' वेबसाइटवर तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी फीचर असावा असे तुम्हालाही वाटत असेल, तर पुढील प्रक्रिया फॉलो करा: 

– सर्व प्रथम तिरंग्यासह आपला सेल्फी सिलेक्ट करा आणि नंतर फोनवर हर घर तिरंगा साइट ओपन करा. 

– याशिवाय, तुम्ही थेट या साईटच्या लिंकवर देखील क्लिक करू शकता.

– आता तुम्हाला फ्लॅगसह सेल्फी अपलोड करण्याचा पर्याय दिसेल.

– या पर्यायावर क्लिक करून, तुम्हाला तुमचे नाव आणि सेल्फी साइटवर अपलोड करावा लागेल.

वरील अगदी सोप्या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचा सेल्फी साईटवर पोस्ट करू शकता. याबरोबरच, भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा जोमाने साजरा करा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo