Happy Teachers Day 2024 Wishes: ‘या’ सुंदर शुभेच्छांसह तुमच्या गुरूंसह ‘शिक्षक दिन’ साजरा करा, WhatsApp Meta AI द्वारे बनवा फोटोज

Updated on 05-Sep-2024
HIGHLIGHTS

दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो.

5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आझाद यांचा जन्मदिन असतो.

WhatsApp वर Meta AI फीचरद्वारे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः फोटो तयार करा.

Happy Teachers Day Wishes: “गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः” अशाप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांचे गुरु देवस्थानी असतात. दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आझाद यांचा जन्मदिन होय. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. याशिवाय, ते उत्तम शिक्षकही होते. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

Also Read: Jio चे 2 जबरदस्त प्लॅन्स! दररोज भरपूर डेटासह एका महिन्याची वैधता, OTT बेनिफिट्स उपलब्ध, पहा किंमत

तुमच्या गुरूंना WhatsApp द्वारे शिक्षक दिनाच्या विशेष शुभेच्छा द्या. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि खास शुभेच्छांची यादी तयार केली आहे. तुमच्या हिंदी भाषिक गुरूंना देखील हिंदीमध्ये शुभेच्छा द्या!

  • गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः या मंत्रात गुरुंच्या महानतेचा आदर दर्शविला जातो.
  • गुरु म्हणजे ज्ञानाचे सर्वोच्च रूप आणि त्यांना नमस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
  • शिक्षक हे आपल्या मनातील बिया रोपतात आणि त्यांना फुलवण्यास मदत करतात. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
  • शिक्षक हा ज्ञानाचा दीपस्तंभ असतो, तो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश आणतो. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • तुमच्या शिकवणीतून मिळालेले ज्ञान, आमचे जीवन समृद्ध करतो. तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच यशाच्या शिखरावर पोहोचवेल.

Teachers Day 2024 साठी स्वतःच बनवा फोटोज

Meta AI फीचर WhatsApp वर उपलब्ध आहे. त्यात कमांड देऊन तुम्ही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः फोटो तयार करू शकता. पुढील सोपी प्रक्रिया पहा-

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल.
  • यानंतर, होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला Meta AI चा ब्लु आयकॉन दिसेल.
  • या ब्लु आयकॉनवर क्लिक करा. मग तुम्ही Meta AI ला कमांड द्या. उदाहरणार्थ, आपण लिहू शकता की “शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 2024 वर फोटो तयार करा.”
  • आता Meta AI एक फोटो तयार करेल आणि तुम्हाला देईल. ही फोटो तुमच्या शिक्षकांसह शेअर करत तुम्ही त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :