Happy Navratri 2024 Wishes: प्रियजनांना WhatsApp वर द्या खास शुभेच्छा, नवरात्रीनिमित्त शेअर करा स्टेटस आणि Videos

Updated on 02-Oct-2024
HIGHLIGHTS

नवरात्री दुर्गापूजा उद्या 3 ऑक्टोबरला सुरू होणार असून 12 ऑक्टोबरपर्यंत चालेल.

नवरात्री सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

नवरात्री सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Happy Navratri 2024 Wishes: नवरात्री म्हणजेच दुर्गापूजा हा बंगालचा सर्वात मोठा सण होय. केवळ बंगालच नाही तर, जगभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात सुद्धा या दिवशी घटस्थापना करतात. यावर्षी दुर्गापूजा उद्या 3 ऑक्टोबरला सुरू होणार असून 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तसेच, मातेच्या भक्तांसाठी हा सण खुप मोठा मानला जातो. गरबा नृत्याद्वारे मातेभोवती प्रदक्षिणा करून भक्तगण हा सण साजरा करतात. या शुभ प्रसंगी आपल्या प्रियजनांना WhatsApp मॅसेज, स्टेटस आणि व्हिडीओद्वारे हार्दिक शुभेच्छा द्या.

Also Read: Amazon GIF Sale दरम्यान भारी Air Fryers वर मिळतोय बंपर Discount, पहा आकर्षक डील्स

Happy Navratri 2024 Wishes

  • “नारी तू नारायणी, नारी तू सबला, तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,नमितो आम्ही तुजला- शुभ नवरात्री!”
  • “कुंकवाचा पावलांनी आई माझी आली, सोन्याच्या पावलांनी आई माझी आली, सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण.
    नवरात्रीच्या शुभेच्छा”
  • देवीची नऊ रुपे पहावी, शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी, अन्नपूर्णेची कृपया होवो, आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो.
  • घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
  • शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो. हीच देवीचरणी प्रार्थना.

WhatsApp स्टेटसद्वारे नवरात्रीच्या शुभेच्छा द्या.

  • मातृ शक्तीचा वास राहो,
    संकटांचा नाश होवो,
    प्रत्येक घरात सुख-शांती नांदो,
    नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जावो. नवरात्रीच्या शुभेच्छा।
  • सर्व मंगल मांगल्ये
    शिवे सर्वार्थ साधिके।
    शरण्ये त्र्यंबके गौरी
    नारायणि नमोऽस्तुते।। शुभ नवरात्री
  • जागर करती भक्तजन सारे,
    ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा..
    करिता गुणगान तुझे अंबे,
    दूर होती साऱ्या व्यथा. नवरात्रीच्या शुभेच्छा।
  • घटस्थापना घटाची,
    नवदुर्गा स्थापनेची,
    आतुरता आगमनाची,
    आली पहाट नवरात्र उत्सवाची. नवरात्रीच्या शुभेच्छा।
  • “शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता,
    चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता,
    संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता.
    सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।
whatsapp

नवरात्रीनिमित्त Video कसे डाउनलोड कराल?

जर तुम्हाला नवरात्री निमित्त व्हीडिओ शेअर करून शुभेच्छा द्यायच्या असतील तर, आवडता Video डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया फॉलो करा.

  • सर्वप्रथम सोशल मीडियावरील म्हणजेच यु-ट्यूब आणि इंस्टाग्रामवरील तुम्हाला आवडलेल्या Video ची लिंक कॉपी करा.
  • आता फोनवर गुगल सर्चवर जाऊन ‘यु-ट्यूब व्हीडिओ डाऊनलोडर’ किंवा ‘इन्स्टा व्हीडिओ डाउनलोडर’ असे सर्च करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर अनेक साईट दिसतील, ज्याद्वारे मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करता येईल.
  • साईट ओपन करून डाऊनलोड करण्यासाठी व्हीडिओची लिंक पेस्ट करा. आता डाऊनलोडींग प्रक्रिया करून व्हीडिओ डाउनलोड करा.
  • हा व्हीडिओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होईल. हा व्हीडिओ तुम्ही WhatsApp वर शेअर करून नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :