Happy Dussehra 2024 Wishes: प्रियजनांना WhatsApp द्वारे द्या सोनेरी सणाच्या शुभेच्छा! ‘अशा’ प्रकारे डाउनलोड करा Video 

Happy Dussehra 2024 Wishes: प्रियजनांना WhatsApp द्वारे द्या सोनेरी सणाच्या शुभेच्छा! ‘अशा’ प्रकारे डाउनलोड करा Video 
HIGHLIGHTS

आज 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी/दसरा आहे.

विजयादशमी/दसरा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

WhatsApp द्वारे शुभेच्छांसह Video पाठवून आणि स्टेटसद्वारे देखील शुभेच्छा देता येतील.

Happy Dussehra 2024 Wishes: भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजेच दसरा सणाला मोठे महत्त्व आहे. आज 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी/दसरा आहे. दसरा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या सणाला धन, ज्ञान आणि शस्त्रांची पूजा केली जाते. दसऱ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना आणि मित्रांना WhatsApp द्वारे अप्रतिम शुभेच्छा द्या. शुभेच्छांसह Video पाठवून आणि स्टेटसद्वारे देखील शुभेच्छा देता येतील.

Happy Dussehra 2024 Wishes
Happy Dussehra 2024 Wishes

WhatsApp द्वारे द्या दसऱ्याच्या शुभेच्छा

  • आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी!
  • सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही, पण नशिबाने जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली. सोन्यासारखे तुम्ही आहातच, सदैव असेच राहा. दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा!
  • आपल्या आतील रावणाचा करा सर्वनाश आणि हृदयामध्ये जपा प्रभू श्री रामाचे नाव, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.
  • स्वत:मधील रावणाचा करा अंत आणि खऱ्या अर्थाने दसऱ्याचे हे आहे आपल्याशी नाते दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आयुष्याच्या नव्या अध्यायाचा करा शुभारंभ आणि सकारात्मक गोष्टींना करा सुरूवात. दसऱ्याच्या खास दिवशी शत्रूंचा करा खात्मा, नकारात्मक उर्जेवर करा मात. दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा!

WhatsApp वर स्टेटस द्वारे द्या शुभेच्छा

  • आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी
    दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
  • झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
    पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
  • आला आला दसरा,
    दुःख आता विसरा
    चेहरा ठेवा हसरा,
    साजरा करु दसरा।
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  • हृदयामध्ये जपा प्रभू श्री रामाचे नाव
    आपल्या आतील रावणाचा करा सर्वनाश
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
  • हृदयामध्ये जपा प्रभू श्री रामाचे नाव
    आपल्या आतील रावणाचा करा सर्वनाश,
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

जर तुम्हाला दसऱ्यानिमित्त व्हीडिओ शेअर करून शुभेच्छा द्यायच्या असतील तर, आवडता Video डाउनलोड करण्यासाठी पुढील अगदी सोपी प्रक्रिया जाणून घ्या.

  • सगळ्यात आधी सोशल मीडियावरील म्हणजेच यु-ट्यूब आणि इंस्टाग्रामवरील तुम्हाला आवडलेल्या Videoची लिंक कॉपी करा.
  • लिंक कॉपी केल्यानंतर तुमच्या फोनवर गुगल सर्चद्वारे ‘यु-ट्यूब व्हीडिओ डाऊनलोडर’ किंवा ‘इन्स्टा व्हीडिओ डाउनलोडर’ असे सर्च करा.
  • आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अनेक साईट दिसतील, ज्याद्वारे मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करता येतील.
  • त्यातील एखादी साईट निवडून ती ओपन करा. डाऊनलोड करण्यासाठी व्हीडिओची लिंक पेस्ट करा. यानंतर डाऊनलोडींग प्रक्रिया करून व्हीडिओ डाउनलोड करा.
  • आता तुमचा आवडता व्हीडिओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होईल आणि तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव होईल. हा व्हीडिओ तुम्ही WhatsApp वर शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा प्रियजनांना देऊ शकता.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo