येत्या 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे.
प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो.
या दिवाळीला तुमच्या प्रियजनांना WhatsApp द्वारे विशेष शुभेच्छा द्या.
Happy Diwali 2024 Wishes: दिवाळी 2024 सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीचा सण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे पाच दिवस चालतो. मराठी कॅलेंडरनुसार येत्या 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे. दिवाळी सण भारताच्या भव्य सणांमधून एक आहे. प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. या दिवाळीला तुमच्या प्रियजनांना WhatsApp द्वारे विशेष शुभेच्छा द्या. पुढीलप्रमाणे विशेष शुभेच्छांसह आनंदात साजरा करा दीपोत्सव:
Happy Diwali 2024 Wishes
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट! दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य आपल्याला मिळू दे. या दिवाळीत आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा मिळू दे.
मराठमोळी संस्कृती आपली, मराठमोळा आपला बाणा, मराठमोळी माणसे आपण, मराठमोळी आपली माती, अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती. दीपोत्सव आनंदात साजरा करा!
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली, नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली, सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली, शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
अशाप्रकारे डाऊनलोड करा WhatsApp साठी Status Video
जर तुम्हाला YouTube आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील दिवाळीनिमित्त शॉर्ट्स व्हिडिओ किंवा रील आवडले असले आणि ते व्हीडिओ WhatsApp स्टेटसवर ठेऊन शुभेच्छा द्यायच्या असतील तर, पुढील प्रक्रिया फॉलो करून व्हीडिओ डाउनलोड करा.
सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या दिवाळी व्हीडिओची लिंक कॉपी करा.
त्यानंतर गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा.
आता तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स दिसतील.
एखादी योग्य साईट निवडून तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा.
अशाप्रकारे तुम्ही मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करा.
हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल.
आता फोनच्या गॅलरीद्वारे हा व्हीडिओ तुम्ही तुमच्या WhatsApp साठी Status वर ठेऊन प्रियजनांना दीपोत्सवाच्या विशेष शुभेच्छा देऊ शकता.
WhatsApp वर दिवाळी AI स्टिकर्स कसे तयार करावे?
Meta AI द्वारे स्टिकर्स तयार करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा.
चॅट्सच्या पुढे दिसणाऱ्या निळ्या वर्तुळातील Meta AI आयकॉनवर क्लिक करा.
आता मेटा AI चॅटमध्ये AI स्टिकर्स व्युत्पन्न करण्यासाठी प्रॉम्प्ट करा. उदा.’हॅपी दिवाळी स्टिकर तयार करा’.
या प्रॉम्प्टनंतर, तुम्हाला WhatsApp चे अनेक नवीन AI जनरेट केलेले दिवाळी स्टिकर्स दिसतील.
तुम्ही स्टिकर्स डाउनलोड करून तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना WhatsApp वर पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा द्या.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.