Happy Diwali 2024 Wishes: ‘या’ विशेष शुभेच्छांसह आनंदात साजरा करा दीपोत्सव, WhatsApp स्टेटससाठी डाउनलोड करा Video 

Happy Diwali 2024 Wishes: ‘या’ विशेष शुभेच्छांसह आनंदात साजरा करा दीपोत्सव, WhatsApp स्टेटससाठी डाउनलोड करा Video 
HIGHLIGHTS

येत्या 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे.

प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो.

या दिवाळीला तुमच्या प्रियजनांना WhatsApp द्वारे विशेष शुभेच्छा द्या.

Happy Diwali 2024 Wishes: दिवाळी 2024 सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीचा सण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे पाच दिवस चालतो. मराठी कॅलेंडरनुसार येत्या 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे. दिवाळी सण भारताच्या भव्य सणांमधून एक आहे. प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. या दिवाळीला तुमच्या प्रियजनांना WhatsApp द्वारे विशेष शुभेच्छा द्या. पुढीलप्रमाणे विशेष शुभेच्छांसह आनंदात साजरा करा दीपोत्सव:

Happy Diwali 2024 Wishes

  • उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट! दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
  • तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
  • सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य आपल्याला मिळू दे. या दिवाळीत आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा मिळू दे.
happy diwali 2024
  • मराठमोळी संस्कृती आपली, मराठमोळा आपला बाणा, मराठमोळी माणसे आपण, मराठमोळी आपली माती,
    अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती. दीपोत्सव आनंदात साजरा करा!
  • उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट! दिवाळीच्या शुभेच्छा
  • नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली, नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली, सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली, शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

अशाप्रकारे डाऊनलोड करा WhatsApp साठी Status Video

जर तुम्हाला YouTube आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील दिवाळीनिमित्त शॉर्ट्स व्हिडिओ किंवा रील आवडले असले आणि ते व्हीडिओ WhatsApp स्टेटसवर ठेऊन शुभेच्छा द्यायच्या असतील तर, पुढील प्रक्रिया फॉलो करून व्हीडिओ डाउनलोड करा.

whatsapp tips
  • सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या दिवाळी व्हीडिओची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा.
  • आता तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स दिसतील.
  • एखादी योग्य साईट निवडून तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा.
  • अशाप्रकारे तुम्ही मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करा.
  • हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल.

आता फोनच्या गॅलरीद्वारे हा व्हीडिओ तुम्ही तुमच्या WhatsApp साठी Status वर ठेऊन प्रियजनांना दीपोत्सवाच्या विशेष शुभेच्छा देऊ शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo