Dhantrayodashi 2024 Wishes: धनत्रयोदशीनिमित्त प्रियजनांना WhatsApp द्वारे द्या शुभेच्छा! ‘अशा’प्रकारे डाउनलोड करा Status साठी Videos 

Dhantrayodashi 2024 Wishes: धनत्रयोदशीनिमित्त प्रियजनांना WhatsApp द्वारे द्या शुभेच्छा! ‘अशा’प्रकारे डाउनलोड करा Status साठी Videos 
HIGHLIGHTS

उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी दिवाळीचा दुसरा दिवस 'धनत्रयोदशी'चा मुहूर्त आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीसह काही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी WhatsApp वर आपल्या प्रियजनांना विशेष शुभेच्छा द्या.

Dhantrayodashi 2024 Wishes: आज 28 नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. आज वसुबारस असून उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी दिवाळीचा दुसरा दिवस ‘धनत्रयोदशी’चा मुहूर्त आहे. धनत्रयोदशीला ध्वनंतरीची पूजा केली जाते. तर, काही ठिकाणी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजादेखील केली जाते. परंपरेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीसह काही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी जीवनात सुख आणि समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

Also Read: दिवाळीला iPhone 15 Pro ची किंमत झाली कमी! येथे Apple च्या लोकप्रिय फोनवर मिळतोय जबरदस्त Discount

धनत्रयोदशीच्या दिवशी WhatsApp वर आपल्या प्रियजनांना विशेष शुभेच्छा द्या. आपल्या मित्रांना पुढीलप्रमाणे आकर्षक आणि अप्रतिम शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस शुभ करा.

Dhantrayodashi 2024 Wishes
Dhantrayodashi 2024 Wishes
  • धनत्रयोदशी नवीन स्वप्ने, नवीन आशा, वैविध्यपूर्ण दृष्टीकोन घेऊन येवो आणि तुमचे जीवन आनंददायी आश्चर्याने भरून जावो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • तुम्हाला संपत्ती, आनंद आणि यशाने भरलेल्या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • या धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी तुमच्या घरावर सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येवो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • धनत्रयोदशीच्या या शुभ दिवशी, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तुमच्या जीवनात आनंद आणू दे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • या धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी समृद्धी आणि यशाच्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करो. धनत्रयोदशी 2024 च्या शुभेच्छा!
  • तुमचे जीवन प्रेम आणि प्रकाशाने प्रकाशित करणाऱ्या उज्ज्वल आणि समृद्ध धनत्रयोदशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा

  • धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवाला, तुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो. तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद मिळेल.
  • जीवनात फक्त प्रकाश असावा, तुमच्या सर्व आशा पूर्ण होवोत, देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो, सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडो. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
  • आला आला दिवाळीचा सण, घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी. धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
  • दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, असा हा धनत्रयोदशीचा सोहळा. धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा!
  • आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, आहे औचित्य दीपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची, धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!
whatsapp tips

‘अशा’प्रकारे डाऊनलोड करा WhatsApp साठी Status Video

जर तुम्हाला YouTube आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील धनत्रयोदशीनिमित्त शॉर्ट्स व्हिडिओ किंवा रील आवडले असले आणि ते व्हीडिओ WhatsApp स्टेटसवर ठेऊन शुभेच्छा द्यायच्या असतील तर. पुढील प्रक्रिया फॉलो करून व्हीडिओ डाउनलोड करा.

  • सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर हे व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी अनेक मोफत साईट्स दिसतील.
  • एखादी योग्य साईट निवडून तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा आणि मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करा.
  • हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल.
  • आता हा व्हीडिओ तुम्ही तुमच्या WhatsApp साठी Status वर ठेऊन प्रियजनांना धनत्रयोदशीच्या विशेष शुभेच्छा देऊ शकता.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo