Hanooman AI Model: Reliance कंपनी पुढील महिन्यात लाँच करेल BharatGPT AI मॉडेल, ChatGPT ची होणार का सुट्टी?
Reliance इंडस्ट्रीज AI सेक्टरमध्ये परदेशी कंपन्यांना जबरदस्त टक्कर देण्यासाठी सज्ज
Reliance कंपनी लवकरच भारतीय Hanooman AI Model लाँच करेल.
BharatGPT चे हे AI मॉडेल 11 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असेल.
टेलिकॉम विश्वातील दिग्गज मुकेश अंबानींची Reliance इंडस्ट्रीज AI सेक्टरमध्ये परदेशी कंपन्यांना जबरदस्त टक्कर देण्यासाठी सज्ज होत आहे. होय, प्रसिद्ध AI चॅटबॉट ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने BharatGPT ची घोषणा केली होती. दरम्यान, आता कंपनी या अंतर्गत आपले पहिले AI मॉडेल आणणार आहे, जे ‘Hanooman’ नावाने सादर केले जाऊ शकते. कंपनीने या मॉडेलच्या लाँचची पुष्टी केली आहे. जाणून घ्या सर्व डिटेल्स-
हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया
Hanooman AI Model
आम्ही तुम्हाला सांगतो की, ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी, Reliance कंपनी BharatGPT विकसित करत आहे. हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठांच्या भागीदारीत तयार केले जात आहे. खरं तर, गेल्या वर्षी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली होती की, कंपनी नवीन AI मॉडेल आणण्यासाठी IIT बॉम्बेसोबत काम करत आहे. कंपनी पुढील महिन्यात आपले पहिले AI मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे.
मुकेश अंबानी यांनी टेक्नॉलॉजी कॉन्फरन्सदरम्यान BharatGPT च्या या नवीन AI मॉडेल ‘Hanooman’ ची घोषणा केली आहे. हे मॉडेल भारतात पुढील महिन्यात मार्चमध्ये लाँच होणार आहे. कंपनीने अद्याप याची अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, BharatGPT चे हे AI मॉडेल 11 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असेल. खरं तर, Hanooman AI मॉडेल विशेषत: चार क्षेत्रांमध्ये काम करेल. ज्यामध्ये आरोग्य सेवा, वित्त सेवा, सरकार आणि शिक्षण यांचा समावेश असेल.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Hanooman AI Model कसे कार्य करेल याची झलकही सादर करण्यात आली. Hanooman AI Model सर्वसामान्यांना कशी मदत करेल, हे पहिल्या झलकमध्ये दिसते. यात एक बाईक मेकॅनिक तमिळमध्ये प्रश्न विचारत असल्याचे दाखवले आहे. तसेच, एक बँकर AI बॉटशी हिंदीमध्ये बोलताना दिसतो. याव्यतिरिक्त, एक विकासक AI मॉडेलच्या मदतीने कंप्यूटर कोड लिहिताना दिसला. याबाबत कंपनी येत्या काळात आणखी बरीच महत्त्वाचे माहिती उघड करण्याची अपेक्षा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile