Its Here! ChatGPT ची होणार का सुट्टी? देशी Hanooman AI तब्बल 98 भाषांमध्ये कार्य करेल, बघा विशेषता। Tech News
OpenAI च्या स्प्रिंग अपडेटच्या काही दिवस आधी Hanooman GenAI लाँच
लोकप्रिय ChatGPT ला जबरदस्त स्पर्धा देण्यासाठी भारतीय Hanooman AI सादर
Android वापरकर्ते वेबवरून हे Hanooman AI चॅटबॉट सहजपणे डाउनलोड करू शकतात.
ChatGPT लाँच झाल्यापासून त्याचा वापर आणि अनुभव बघता वापरकर्त्यांची या AI ला मोठी पसंती मिळाली. दरम्यान, लोकप्रिय ChatGPT ला जबरदस्त स्पर्धा देण्यासाठी भारतीय Hanooman AI देखील सादर करण्यात आले आहे. OpenAI च्या स्प्रिंग अपडेटच्या काही दिवस आधी Hanooman GenAI लाँच करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Hanooman हा भारताचा स्वतःचा चॅटबॉट आहे, जो भारतीय प्रेक्षकांवर केंद्रित आहे.
हे सुद्धा वाचा: कमी किमतीत मिळेल जबरदस्त कॅमेरा! Tecno ची आगामी Camon 30 सिरीज ‘या’ दिवशी होणार भारतात लाँच। Tech News
Hanooman GenAI
Hanooman GenAI मॉडेल भारतीय प्रेक्षकांसाठी अधिक योग्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे AI प्लॅटफॉर्म सीता महालक्ष्मी हेल्थकेअर (SML) आणि अबू धाबी-आधारित गुंतवणूक फर्म 3AI होल्डिंग लिमिटेड यांनी तयार केले आहे. Hanooman ही ओपन-सोर्स भारतीय भाषा मॉडेलची सिरीज आहे, जी एकाधिक भारतीय भाषांमध्ये मजकूर आणि भाषण दोन्ही तयार करू शकते. सध्या हे AI मॉडेल तब्बल 98 जागतिक भाषांमध्ये लाइव्ह आहे, त्यापैकी 12 भारतीय भाषा आहेत.
‘अशा’ प्रकारे वापर करा.
Hanooman AI चॅटबॉट वापरणे अगदी सोपे आहे. Android वापरकर्ते वेबवरून हे ॲप सहजपणे डाउनलोड करू शकतात. या AI मॉडेलचे iOS ॲप देखील लवकरच सादर केले जाईल. तसेच, Hanooman AI चॅटबॉटचा ऍक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही वेबचा वापर देखील करू शकता.
ChatGPT पेक्षा वेगळे कसे?
भारतात बरेच लोक बोलण्यासाठी किंवा टाईप करण्यासाठी इंग्रजी भाषेचा उपयोग करत नाही. लोकप्रिय AI मॉडेल ChatGPT सह भाषेचा अडथळा मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. तर दुसरीकडे, Hanooman GenAI मॉडेल तब्बल 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, उडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि सिंधी या भारतीय भाषांचा समावेश आहे. केवळ भारतीयच नाही तर ही प्रणाली अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile