भारतात अधिकृतरित्या लाँच झाला गोप्रो, किंमत २०,००० पासून सुरु

Updated on 03-Jun-2016
HIGHLIGHTS

अजूनपर्यंत ह्याच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र ह्याची किंमत २०,००० रुपयांपासून सुरु होईल, असे सांगण्यात येतय.

गोप्रोने रिलायन्स डिजिटलसह पार्टनरशिपच्या अंतर्गत भारतात आपली गोप्रो कॅमेरा सीरिज लाँच केली. ह्यात गोप्रोने हिरो सेश, हिरो 4 सिल्वर आणि हिरो 4 ब्लॅक कॅमेरे लाँच केले. हे कॅमेरे ऑनलाइन शॉपिंग साइट्स अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.
ह्यांच्या किंमतीबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र गोप्रो हिरो 4 सेशन अॅमेझॉनवर २०,६५० रुपयात मिळत आहे. तर हिरो 4 सिल्वर ३१, ८२५ रुपये आणि 4 ब्लॅक ची किंमत ४५,९९० रुपये आहे.

हेदेखील पाहा – झोलो वन HD रिव्ह्यू

हिरो 4 सेशन उत्कृष्ट HD क्वालिटी देतो आणि हा 8 मेगापिक्सेलची स्टील इमेज देतो. हा वॉटरप्रुफ कॅमेरा आहे. ह्याला एका बटनाने नियंत्रित करु शकतात. तर हिरो 4 सिल्वर 2.7K HD व्हिडियो रिझोल्युशनवर रेकॉर्डिंग करु शकतो. तसेच ह्यात १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हिरो 4 ब्लॅक 4K अल्ट्रा HD व्हिडियो रेकॉर्ड करतो. हे तिन्ही कॅमेरे वायफाय आणि ब्लूटुथ कनेक्टिव्हिटीसह येतात. ह्यांना गोप्रो स्मार्टफोन अॅपच्या माध्यमातून कनेक्ट केले जाऊ शकते.

हेदेखील वाचा – HP चा हा नोटबुक आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका नोटबुक
हेदेखील वाचा – 
लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :