काय ! Google बंद करणार Gmail अकाउंट्स ? तुमचे खाते देखील आहे का यादीत ?

Updated on 17-May-2023
HIGHLIGHTS

Google द्वारे लाखो Gmail आणि Google Photos अकाउंट्स बंद केली जातील.

डिसेंबर 2023 च्या सुरुवातीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होईल.

Gmail वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरं तर, ही बातमी तुम्हाला थोडं चिंतीत करेल. Google द्वारे लाखो Gmail आणि Google Photos अकाउंट्स बंद केली जातील. Google ने घोषणा केली आहे की डिसेंबर 2023 च्या सुरुवातीपासून, Gmail आणि Google Photos खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आता तुमच्या मनात विचार येत असतील की, का? कसे ? आणि कधी? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा. 

मिळालेल्या माहितीनुसार, निष्क्रिय Google Photos आणि Gmail खाती Google द्वारे बंद केली जातील. म्हणजे गुगल अशी सर्व खाती बंद करेल, जी एक ते दोन वर्षांपासून बंद आहेत. 

या निर्णयामागील कारण काय?

गुगलचे मत आहे की, जे खाती एक-दोन वर्षांपासून वापरली गेली नाहीत ती अनावश्यक आहेत. अशी सर्व खाती बंद केली जातील. यामुळे सिक्योरिटी मजबूत करण्यात मदत होईल, असे Google ला वाटते. Google द्वारे वैयक्तिक Gmail आणि Google Photos अकाउंट्स बंद केले जातील. हा नियम स्कुल आणि बिझनेस अकाउंट्सला लागू होणार नाही.

एकत्र सर्व निष्क्रिय खाती बंद होणार का ?

गुगलच्या मते, सर्वप्रथम ती खाती बंद केली जातील, जी तयार झाल्यानंतर कधीही वापरली गेली नाहीत. दरम्यान, कोणतेही खाते बंद करण्यापूर्वी, कंपनी काही महिन्यांअगोदर त्या खात्यावर संदेश पाठवेल की तुमचे खाते निष्क्रिय असल्यामुळे बंद केले जात आहे. 'अशा'प्रकारे निष्क्रिय खाती एकाच वेळी बंद होणार नाहीत. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होईल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :